राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष व माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी आपल्या वाढदिवसादिनी चांदीच्या तलवारीने केक कापला.याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रकार सार्वजनिक ठिकाणी झाला असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी ठाकरे गटाचे शहर संपर्कप्रमुख रवीकरण इंगवले यांनी केली आहे. याबाबत त्यांनी तक्रार अर्ज लक्ष्मीपुरी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.
24 नोव्हेंबर रोजी राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी मोठ्या उत्साहात वाढदिवस साजरा केला.वाढदिवस साजरा करत असताना त्यांनी चांदीच्या तलवारीने केक कापला. केक कापण्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरात व्हायरल होत आहे.भारतीय हत्यार अधिनियम कायदा कलम 4 आणि 25 प्रमाणे हा प्रकार बेकायदेशीर असून तो दखलपात्र गुन्हा आहे. कायद्यानुसार क्षीरसागर यांच्यावर गुन्हा दाखल करावा. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता हा गुन्हा दाखल करावा,अन्यथा आम्ही न्यायालय स्तरावर दाद मागू असा इशारा रविकिरण इंगवले यांनी दिला आहे.यापूर्वी पोलिसांनी अनेक पक्षाच्या कार्यकर्त्यांवर आणि तरुण मंडळांच्या कार्यकर्त्यांवर तलवारीने केक कापल्याबद्दल गुन्हा नोंद केला आहे.त्यामुळे क्षीरसागर यांच्यावर देखील गुन्हा नोंद करावा, अशी मागणी इंगवले यांनी केली आहे.
घडलेल्या प्रकारावर राजेश क्षीरसागर काय म्हणाले बिनपरवाने हत्यार वापरून आम्ही खून, मारामारी केली नाही.मी आजवर अनेकांचे प्राण वाचवले आहेत. सर्वसामान्यांना वैद्यकीय मदत दिली आहे.पण चांदीची तलवार माझ्या संग्रहि आहे.त्या तलवारीने केक कापला आहे. अशी प्रतिक्रिया राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.