Friday, November 22, 2024
Homeसांगलीसीमा वाद पुन्हा चिघळला मिरजेत अथणी पुणे कर्नाटक बस समाज कंटकांनी फोडली

सीमा वाद पुन्हा चिघळला मिरजेत अथणी पुणे कर्नाटक बस समाज कंटकांनी फोडली

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कर्नाटक महाराष्ट्र वाहतूक करणाऱ्या दोन्ही राज्याच्या बसेस बंद करण्यात आल्या

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद पुन्हा उफाळून आला आहे रात्रीच्या सुमारास कर्नाटक आगाराची बस फोडल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. अथणी मिरज सांगली मार्गे पुण्याला जाणारी कर्नाटक बसवर रात्री समाजकंटकांनी दगडफेक करून बसची काच फोडली आहे रात्रीपासून ही घटना समजल्यानंतर कर्नाटक सीमेवर मिरज ग्रामीण पोलिसांनी कोणतीही अप्रिय घटना घडू नये यासाठी बंदोबस्त तैनात केला आहे.

महाराष्ट्र कर्नाटक राज्याची बस वाहतूक दोन्ही राज्यांनी बंद ठेवली आहे त्यामुळे सीमा भागावर बस पास द्वारे प्रवास करून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे आज सकाळपासून प्रवासी मिरज बस स्थानक मध्ये बसून आहेत मिरज आगार मध्ये कर्नाटक बसेस येत नसल्याने प्रवासी मिळेल त्या वाहनाने कर्नाटक सीमेवर जात आहेत त्या ठिकाणी कर्नाटक राज्यातून येणाऱ्या बसेस सीमा भागावरच प्रवाशांना सोडून परत जात आहेत त्यामुळे परत महाराष्ट्र सीमेत आल्यानंतर दुसऱ्या वाहनाने प्रवास करण्याची वेळ प्रवाशांच्यावर आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -