ताजी बातमी ऑनलाईन टीम
कोट्यवधी व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे वैयक्तिक तपशील चोरीला गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग सेवा देणाऱ्या व्हाट्सअॅपकडून ही चूक झाली आहे. व्हॉईस/व्हिडिओ कॉल करण्यापासून ते पेमेंट करण्यापर्यंत अनेक गोष्टींसाठी सध्या व्हाुट्सअॅपचा वापर केला जातो. एक विश्वासार्ह अॅप्लीकेशन म्हणून लोक Meta च्या मालकीचे या अॅपचा वापर करतात आणि त्याला आपल्या फोनमध्ये वेगवेगळ्या गोष्टींसाठी परवानगी देतात. जगभरातील व्हाट्सअॅपचे दोन अब्ज यूजर्सं आहेत. मात्र नुकताच पसिद्ध झालेल्या एका रिपोर्टमध्ये सुमारे 500 दशलक्ष व्हाट्सएप वापरकर्त्यांचे फोन नंबर असलेला डेटाबेस हॅकिंग कम्युनिटी फोरमवर विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण सविस्तर जाणून घेऊया.
व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचा डेटा चोरी
सायबरन्यूजच्या वृत्तानुसार, एका विक्रेत्याने हॅकिंग कम्युनिटी फोरमवर 500 अब्ज WhatsApp वापरकर्त्यांचा डेटाबेस विक्रीसाठी ठेवला होता. या डेटाबेसमध्ये वापरकर्त्यांचा फोन नंबर होता. रिपोर्टनुसार या विक्रेत्याने डेटाबेसमध्ये 487 दशलक्ष फोन नंबर असल्याचा दावा केला होता आणि यात भारतासह 84 वेगवेगळ्या देशांमधील सक्रिय व्हाट्सएप वापरकर्त्यांचा समावेश होता.