बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू लवकरच ब्लर चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या या चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. काही दिवसांपूर्वीच या चित्रपटाचे पोस्टर रिलीज करण्यात आले होते. अशामध्ये आता या चित्रपटाचा थरकाप उडवणारा टीझर रिलीज झाला आहे. जो पाहून चाहत्यांमधील उत्सुकता आणखी वाढली आहे. ब्लरचा टीझर पाहून तापसी पन्नूचा हा चित्रपट सस्पेन्स आणि थ्रिलने भरलेला असल्याचे दिसून येत आहे.
तापसीच्या ब्लर चित्रपटाच्या टीझरची सुरुवातच ब्लर दृश्याने होते. असे वाटते की समोर काळ्या रंगाचा पडदा लावला आहे आणि पुढचे दृश्य स्पष्ट दिसत नाही. त्यानंतर फोन वाजतो आणि तापसीचा आवज येतो. तापसी फोनवर विचारते कोण आहे?, तू शांत का आहेस? उत्तर का देत नाहीस? मला माहित आहे की तू इथेच आहेस आणि तू मला पाहतो आहेस? यावेळी एक ती शिव्या देखील देते. त्यानंतर टीझरच्या शेवटी तापसीच्या ओरडण्याचा आवाज देखील येतो.
तापसी पन्नूने अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ‘ब्लर’चा टीझर शेअर केला आहे. टीझर शेअर करत तिने कॅप्शनमध्ये असे लिहिले आहे की, ‘सर्व बाजूंनी धोकाचे संकेत आहे. पण गायत्री त्याला पाहू शकेल? तिच्या नजरेतून जगाला पाहण्यासाठी तयार राहा.’ ब्लर चित्रपट जी 5 प्रीमियरवर 9 डिसेंबरला रिलीज होणार आहे. हा चित्रपट सायकॉलॉजिकल थ्रिलर असणारा आहे. एका महिलेच्या संघर्षावर भाष्य करणारा हा चित्रपट आहे. गायत्रीला हळूहळू दिसण्यास अडचण होते आणि या दरम्यान तिला आपली जुडवा बहिणीच्या मृत्यूचा तपास देखील करायचा आहे.
ब्लर चित्रपटाचे दिग्दर्शन अजय बहल यांनी केले आहे. हा चित्रपट जी 5 या या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे. यामध्ये तापसी पन्नू आणि गुलशन देवय्या मुख्य भूमिकेत आहेत. अजय बहल यांनी पवन सोनी यांच्यासोबत या चित्रपटाचे कथानक लिहिले आहे. या चित्रपटातून प्रेक्षकांना सस्पेन्स, थरार आणि नाट्य पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाच्या टीझरला प्रेक्षकांकडून खूप चांगली पसंती मिळाली आहे. आता सर्वांना चित्रपट कधी रिलीज होणार याची उत्सुकता लागली आहे.
तापसी पन्नूच्या ‘ब्लर’चा थरकाप उडवणारा टीझर आऊट, चाहत्यांमध्ये वाढली उत्सुकता!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -