ताजी बातमी ऑनलाइन टीम
टीम इंडियाचा माजी खेळाडू सुरेश रैना आज आपला 36 वा वाढदिवस साजरा करत आहे. मिस्टर आयपीएल असण्यासोबतच तो 2011 च्या विश्वचषक विजेत्या टीमचाही एक भाग होता. 2020 मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केला. तसंच त्याने आयपीएललाही (पूर्णपणे रामराम केलाय. सुरेश रैनाने आता क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो तज्ज्ञ आणि क्रिकेट समालोचक म्हणून अधूनमधून दिसतो. सुरेश रैनाने क्रिकेटचे मैदान चांगलेच गाजवले. तो क्रिकेट विश्वात जसा चर्चेत राहिला तसा तो त्याच्या लव्हलाईफमुळे देखील चांगलाच चर्चेत होता. सुरेश रैनाचे साऊथचा सुपरस्टार कमल हासनची मुलगी आणि अभिनेत्री श्रुती हासनसोबतच्या अफेअरमुळे खूप चर्चेत होता. पण नंतर त्याने आपली बालपणीची मैत्रीण प्रियंकासोबत लग्न केले.
श्रुती हासनसोबतच्या अफेअरने सुरेश रैना खूप चर्चेत होता. पण दोघांपैकी कोणीही आपल्या नात्याबद्दल कधीच कबुली दिली नाही. तसंच त्यांनी आपल्या नात्याबद्दल काहीच माहिती दिली नाहीत. पण ते अनेकदा मीडिया समोर एकत्र दिसले. सुरेश रैना आणि श्रुती हसन यांची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून मुंबईत झाल्याचे सांगितले जाते. त्यानंतर दोघेही बऱ्याचदा दक्षिण मुंबईत भेटायचे आणि अनेकवेळा ते एका पॉश रेस्टॉरंटमध्येही स्पॉट झाले होते. मात्र, 2017 मध्ये रैनाने याबाबत सांगितले होते की, तो कोणाला डेट करत नाही.
सुरेश रैना आणि श्रुतीच्या अफेअरच्या चर्चा जोरदार रंगल्य होत्या. त्यावेळी श्रुती देखील आयपीएलमध्ये चेन्नईच्या जर्सीत दिसली होती. मात्र तिने कोणासोबत अफेअर नसल्याचे सांगत ती फक्त चेन्नई टीमला सपोर्ट करण्यासाठी आल्याचे सांगितले होते. सुरेश रैना आणि श्रुतीचे नाते का तुटले याबद्दल अजून कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण काही दिवसांनी सुरेश रैनाने तिची बालपणीची मैत्रीण प्रियंकासोबत लग्न केले. सुरेश रैना आपल्या मॅरीड लाईफमध्ये खूपच खुश आहे. सुरेश आणि प्रियंका सध्या दोन मुलांचे पालक आहेत. रैना अनेकदा आपल्या मुलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतो.
मूळचा काश्मीरचा असलेला सुरेश रैना गाझियाबादच्या मुरादनगरमध्ये राहतो. वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी त्याने क्रिकेटर होण्याचा निर्णय घेतला होता. पण ज्या प्रशिक्षकाकडून सुरेश रैनाने लहानपणी खेळाचे प्रशिक्षण घेतले होते त्या प्रशिक्षकाच्या मुलीच्या प्रेमात सुरेश रैना पडला. सुरेश रैनाची लव्हस्टोरी खूपच फिल्मी आहे. प्रियांकाचे वडील सत्पाव हे मुरादनगर येथील महाविद्यालयात टीचर तसेच स्पोर्ट्स टीचर होते. सुरेशने लहानपणी त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतले आणि याच दरम्यान त्याची प्रियांकाशी मैत्री झाली. हळूहळू त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले. प्रियंका त्यावेळी नेदरलँडमध्ये बँकिंग क्षेत्रात काम करत होती. पण रैनासोबत भारतात राहण्यासाठी तिने नोकरी सोडली. यानंतर दोघांनी 3 एप्रिल 2015 रोजी दिल्लीतील लीला प्लेस हॉटेलमध्ये लग्न केले.