ताजी बातमी ऑनलाईन टीम
कित्येक वर्षांपासून प्रलंबित रस्त्याचे काम होत नसल्याने हा सुद्धा नावाचा अवमान असल्याची टीका
मिरज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावे असलेला हा रस्ता जागोजागी असलेले खड्डे, धुळीचे साम्राज्य, अतिक्रमणे यामुळे राज्यभर बदनाम झालेला आहे. हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान कधी राज्यपाल, कधी प्रवक्ते,लोकप्रतिनिधी अशा बऱ्याच लोकांच्याकडून वारंवार होत आहे. यातच भरीस भर म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव ज्या रस्त्याला आहे.
तो रस्ता बदनाम होवून पर्यायाने यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव बदनाम होत आहे व कोणतीही संबंधित यंत्रणा हा रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून पुढे येताना दिसून येत नाही.. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने काम चालू केले आहे पण ते स्पेसिफिकेशनप्रमाणे काम चालू असलेने व यावर लोक प्रतिनिधी काही कारवाई करीत नाहीत. अशी टीका मराठा महासंघाकडून करण्यात आली असून याकरिता अखिल भारतीय मराठा महासंघाकडून सांगली मिरज कुपवाड महापालिकेचे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना निवेदन देण्यात आले आहे या रस्त्याचे नाव बदलण्याचा ठराव येणाऱ्या सर्वसाधारण सभेमध्ये करून घेऊन आणि या रस्त्याच्या दुर्दशेला येथील जे कोणी जबाबदार आहेत. त्यांचं नाव या रस्त्याला देण्यात यावे व छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाची बदनामी थांबवावी अशी विनंती या निवेदनात देण्यात आली आहे यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाचे विभागीय पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष विलास देसाई विजय धुमाळ संतोष माने किरण भुजुगडे धनंजय भिसे धनंजय शिंदे अभिजीत शिंदे सचिन जाधव विशाल पाटील रविराज शिंदे इत्यादी जण उपस्थित होते.