Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञान‘जिओ’ने अचानक बंद केली ‘ही’ महत्वाची सेवा, ग्राहकांवर होणार मोठा परिणाम…

‘जिओ’ने अचानक बंद केली ‘ही’ महत्वाची सेवा, ग्राहकांवर होणार मोठा परिणाम…

रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी डेटा लोन सेवा सुरु केली होती. ग्राहकांना लोनच्या स्वरुपात डेटा दिला जात होता. आपत्कालिन परिस्थितीत ग्राहकांना ही सेवा अतिशय उपयुक्त ठरली होती. मात्र, जिओने कोणतेही कारण न देता, अचानक ही सेवा बंद केली आहे. त्यामुळे ग्राहकांना यापुढे ही सेवा मिळणार नाही.

उधारीवर 2GB डेटा

इंटरनेटचा वापर जादा झाल्यास, अचानक डेटा संपल्यावर ग्राहकांची अडचण होत होती. अशा वेळी ग्राहकांना जिओ डेटा लोन योजनेचा फायदा होत होता. या योजनेत ग्राहकांना 2GB डेटा उधारीवर मिळत असे. सध्या कंपनीने ही सेवा बंद केली असून, तात्पुरत्या काळासाठी ही सेवा उपलब्ध नसेल, असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.

जिओ डेटा लोन घेण्यासाठी ग्राहकांना ‘माय जिओ’ अॅपमध्ये जावे लागत होते. जिओ क्रमांकावरुन लॉग इन केल्यानंतर टॉप लेफ्ट मेन्यूमध्ये डेटा लोनचा पर्याय मिळत असे. त्यावर क्लिक केल्यानंतर ग्राहकांना डेटा लोन घेता येत होते. कंपनीने अचानक ही सेवा बंद केल्याने ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

आता डाटा व्हाऊचरचाच पर्याय

माय जिओ अॅपमध्ये मिळणारी ही सेवा आता बंद झाली आहे. हा पर्याय शोधला असता, ही सेवा तात्पुरती बंद झाल्याचे दिसते. उधारीवर मिळणारा डेटा बंद झाल्याने अत्यावश्यक वेळी ग्राहकांना डेटा रिचार्ज करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही.

आता अचानक डाटा संपला, तर ग्राहकांना डाटा व्हाऊचरचाच पर्याय आहे. जिओच्या डाटा व्हाऊचरची सुरुवात 15 रुपयांपासून असून, त्यात 1GB डाटा मिळतो, तर 2GB डाटासाठी ग्राहकांना 25 रुपये खर्च करावे लागणार आहेत. त्यामुळे जिओच्या निर्णयामुळे ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -