Sunday, December 22, 2024
Homeबिजनेसडिजिटल रुपयाची 'या' शहरांमध्ये सुरुवात, करोडो लोकांना होणार व्यवहारात फायदा!

डिजिटल रुपयाची ‘या’ शहरांमध्ये सुरुवात, करोडो लोकांना होणार व्यवहारात फायदा!

देशभरात डिजिटल रुपयाच्या व्यवहाराबाबत रिझर्व्ह बँकेकडून मोठी मोहीम सुरू झाली आहे.आरबीआय 1 डिसेंबरपासून म्हणजेच आजपासून रिटेल डिजिटल रुपयाचा (e₹-R) पहिला पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. याबाबत सरकारने अर्थसंकल्पात घोषणा केली होती आणि आता देशभरात डिजिटल चलनाला प्रोत्साहन देण्यासाठी अनेक योजना आखल्या जात आहेत.

आरबीआयने डिजिटल चलनाला सेंट्रल बँक डिजिटल करन्सी (CBDC) असे नाव दिले आहे. यामुळे देशाला कॅशलेस बनवण्यातही मोठी मदत होणार आहे. मात्र, सरकारच्या या निर्णयामुळे यूपीआय किंवा पेटीएम, गुगल पे आणि फोन पे सारख्या सुविधांवर परिणाम होईल का? असा सवाल उपस्थित होत आहे. पण, मीडिया रिपोर्ट्सनुसार, डिजिटल वॉलेट आणि मोबाईल वॉलेटचा विचार केला तर या दोघांमध्ये कोणतीही स्पर्धा नाही. कॅशलेस सिस्टमला प्रोत्साहन देण्यासाठी डिजिटल पेमेंट हा एक नवीन मार्ग आहे. पहिल्यांदा तुम्हाला एकदा डिजिटल रुपया विकत घ्यावा लागेल आणि त्यानंतर तुम्ही तुमच्या वॉलेटमधून व्यवहार करू शकाल.

ब्लॉकचेन आधारित डिजिटल सिस्टम
दरम्यान, डिजिटल चलन ही एक प्रकारची ब्लॉकचेन आधारित डिजिटल सिस्टम आहे, ज्या अंतर्गत तुम्ही व्यवहार करू शकाल. याशिवाय, रिटेल व्यवहार चलनासाठी तुम्हाला कोणत्याही बँकेला सामील करण्याची गरज नाही, म्हणजेच तुम्ही त्याशिवाय व्यवहार करू शकता. ही प्रणाली UPI पेक्षा खूप वेगळी आहे.

कोणत्या शहरात होणार सुरुवात?
सरकारकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात 4 शहरांमध्ये याची सुरुवात होणार आहे. पहिल्यांदा ही सेवा मुंबई, नवी दिल्ली, बंगळुरू आणि भुवनेश्वर येथे सुरू होईल. त्यानंतर हैदराबाद, अहमदाबाद, गंगटोक, गुवाहाटी, इंदूर, कोची, लखनौ, पाटणा आणि शिमला येथे वाढवण्याची योजना आहे. याशिवाय, सर्वात आधी या सेवेची सुरुवात एसबीआय, आयसीआयसीआय बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँकसह सुरू होईल.यानंतर बँक ऑफ बडोदा, युनियन बँक, कोटक बँक आणि एचडीएफसी बँक यांचा त्यात समावेश केला जाईल.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -