Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजन'कर्म फेडावं लागेल...', Malaika Arora च्या प्रेग्नंसीच्या बातमीवर अर्जुनचा संताप

‘कर्म फेडावं लागेल…’, Malaika Arora च्या प्रेग्नंसीच्या बातमीवर अर्जुनचा संताप

ताजी बातमी ऑनलाइन टीम

बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा हे कपल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे नेहमीच चर्चेत असतं. दोघेही अनेक वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. ते दोघे कधी लग्नबंधनात अडकणार याची प्रतिक्षा त्या दोघांचे चाहते करत आहेत. मात्र, नुकतीच अर्जुननं ‘कॉफी विथ करण’मध्ये हजेरी लावली होती त्यावेळी सध्या कामावर लक्ष केंद्रीत केलं आहे असं सांगितलं. दरम्यान, या सगळ्यांमध्ये मलायका गर्भवती असल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. या चर्चांवर एक पोस्ट शेअर करत अर्जुननं संताप व्यक्त केला आहे.



अर्जुननं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटच्या स्टोरीवरून ही पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये अर्जुन म्हणाला की कर्म शेवटी प्रत्येकाच्या मागे परत येतो. तुम्ही तुमचं संपूर्ण आयुष्य लोकांना बोलतात ते तुमच्याकडे येणार आहेच. तुम्ही कोण आहात याची मला पर्वा नाही. जे करता ते परत एक दिवस येतच. उशिरा का होईना पण नक्कीच येतं. तुम्ही ज्याचे पात्र आहेत ते युनिव्हर्स नक्कीच देईल.

मलायकाच्या गरोदरपणावर अर्जुन कपूर असं म्हणाला, ‘अशा बातम्या तथ्यहीन आणि असंवेदशील आहेत. आमच्याबाबीत सतत अशा प्रकारच्या बातम्या आर्टिकल्समधून येत आहेत ज्याच्याकडे आम्ही दुर्लक्ष करत आहोत. हे बरोबर नाही. आमच्या खासगी आयुष्याशी कोणी खेळ करण्याची हिंमत करू नये.

‘पिंकविला’नं दिलेल्या माहितीनुसार, मलायका गरोदर असून अर्जुनच्या बाळाची आई होणार आहे. मलायका व अर्जुन ऑक्टोबर महिन्यात लंडन ट्रिपला गेले होते. तेव्हाच त्यांनी ही गुड न्यूज त्यांच्या नातेवाईकांना दिली असल्याची माहिती पिंकविलाने दिली होती. त्यावरून माध्यमांमध्ये या संदर्भात चर्चा होऊ लागल्या आणि अखेर अर्जुनने संतापून आपले मत व्यक्त केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -