Sunday, February 23, 2025
Homeइचलकरंजीहुपरी : विनयभंग केल्याप्रकरणी युवकास अटक

हुपरी : विनयभंग केल्याप्रकरणी युवकास अटक

ताजी बातमी ऑनलाईन टीम

शालेय विद्यार्थीनीचा मोटर सायकलने पाठलाग करून विनयभंग केल्याप्रकरणी हुपरी पोलिसांनी एका रोड रोमिओला अटक केली आहे. अमन शाजीद जमादार (दय१९ रा. कुंभार मळा, हुपरी) असे त्याचे नाव आहे. रात्री उशिरा या घटनेची नोंद हुपरी पोलिस ठाण्यात झाली आहे.



गेल्या पाच महिन्यांपासून पिडित मुलीचा आरोपी पाठलाग करत आहे तिला पाहुन लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करत आहे. माझ्या मुलीला वारंवार त्रास देत आहे. याबाबत आरोपीस बऱ्याचवेळा समज दिली आहे. तरीही आज पुन्हा शाळेतून घरी येताना पाठलाग करून त्रास दिला होता. घरी आल्यावर मुलीने सगळी हकीकत सांगितली. याबाबत विचारणा केली असता आम्हालाच आरोपीने शिवीगाळ करून दमदाटी करीत असल्याचे फिर्याद अस्लम अल्लाउद्दीन जमादार यानी हुपरी पोलिस ठाण्यात दिली आहे. संशयितावर विनयभंगासह पोस्को अंतर्गत गुन्हा नोंद झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -