Sunday, December 22, 2024
Homeक्रीडाकेएल राहुल-अथिया शेट्टी लवकरच बोहल्यावर चढणार! लीक झाली लग्नाची तारीख?

केएल राहुल-अथिया शेट्टी लवकरच बोहल्यावर चढणार! लीक झाली लग्नाची तारीख?


क्रिकेटर केएल राहूल आणि आणि अभिनेत्री आथिया शेट्टी हे दोघे गेल्या अनेक दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक इव्हेंटमध्ये दोघे एकत्र दिसले आहेत. तेव्हापासून त्यांच्या अफेअरची चर्चा होती. आता दोघे लवकरच लग्न करणार असल्याची माहिती समोर येत आहे. अद्याप दोघांच्या कुटुंबीयांकडून याबाबत कोणतीही तारीख निश्चित केलेली नाही. परंतु मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला तर दोघांच्या लग्नाची तारीख लीक झाली आहे. राहुलने लग्नासाठी काही दिवसांची रजा मागितली होती आणि ती बीसीसीआयने मान्य केली आहे.

कधी होणार लग्न ?
सध्या अथिया शेट्टी आणि केएल राहुल यांच्या लग्नाची चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे आणि यासाठी त्यांचे देखील पालक देखील सहमत आहेत. यापूर्वी स्वतः सुनील शेट्टी यांनी लग्नाच्या तारखेचा निर्णय मुलांवर सोडल्याचे सांगितले होते. दरम्यान, नुकत्याच समोर आलेल्या मीडिया रिपोर्ट्सनुसार दोघांच्या लग्नाची तारीख लीक झाली आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात राहुल अथियाशी लग्न करू शकतो.

बीसीसीआयने मंजूर केली सुट्टी
या खास सोहळ्यासाठी राहुलने बीसीसीआयकडे रजा मागितली होती. आता त्याची रजा बीसीसीआयने मंजूर केल्याचे सांगण्यात येत आहे. ही सुट्टी राहुलने लग्नासाठीच घेतल्याचा अंदाज लावला जात आहे. रिपोर्ट्सनुसार दोघे 2023 च्या सुरुवातीला म्हणजे जानेवारी महिन्यातच लग्न करू शकतात आणि हे लग्न जानेवारीच्या पहिल्या आठवड्यातच होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -