Thursday, November 21, 2024
Homeआरोग्यटेन्शन वाढलं! पुण्यात नव्या विषाणूची एन्ट्री, ही लक्षणं आढळल्यास सावधान

टेन्शन वाढलं! पुण्यात नव्या विषाणूची एन्ट्री, ही लक्षणं आढळल्यास सावधान

ताजी बातमी ऑनलाईन टीम

पुणेकरांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. पुण्यात नव्या विषाणूची एन्ट्री झाल्याने खळबळ उडाली आहे. पुणे शहरात पहिल्यांदाच ‘जॅपनीज इन्सेफेलायटीस’ म्हणजे जेई अर्थात मेंदूज्वरचा रुग्ण सापडला आहे. पुण्यातल्या वडगाव शेरी इथल्या 4 वर्षांच्या बालकात या विषाणूची लक्षण दिसली असून त्याच्यावर 3 नोव्हेंबरपासून ससून रुग्णालयातील बालरोग विभागात उपचार सुरु आहेत. एनआयव्हीमधून याचा अहवाल आला असू हा बालक जेई पॉझिटिव्ह असल्याचं नमुद करण्यात आलं आहे.



आरोग्य विभाग सतर्क
जेई पॉझिटिव्ही रुग्ण आढळल्याने आरोग्य विभाग सतर्क झालं आहे. ज्या परिसरात जेई पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे, त्या परिसरातील डासांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. त्या रुग्णाच्या घरातील तसंच आसपासच्या घरातील विशेषतः 15 वर्षाखालील मुलांच्या रक्त नमुने घ्यायला सुरवात करण्यात आली आहे. या परिसरातील तापाच्या रुग्णांचं सर्वेक्षण करण्यात येत आहे. दररोज 500 ते 600 लोकांचं सर्वेक्षण महापालिकेच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

पुणे शहराच्या आतापर्यंतच्या इतिहासात ‘जेई’ चा हा पहिलाच रुग्ण आढळून आलेला आहे. याआधी पुण्यात आढळून आलेले रुग्ण हे पुणे जिल्ह्यातील होते. पुणे पालिकेकडून उपाययोजना आखण्यात आल्या आहेत.

जेई विषाणूची लक्षणं काय आहेत?
या बालकाला नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीला ताप आणि डोकेदुखी अशी लक्षणं होती. ताप वाढून त्याला तापाचा झटका आला. त्यात त्याचा एक हात आणि पायदेखील कमकुवत झाला. या बालकावर सुरुवातीला खासगी आणि नंतर ससून रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आलं. सध्या ससून रुग्णालयात या बालकावर गेल्या दहा दिवसांपासून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यामध्ये थोडी सुधारणा झाली असून, सध्या तो ससूनमध्ये सर्वसाधारण वॉर्डमध्ये उपचार घेत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -