ताजी बातमी ऑनलाईन टीम
वीवो Y02 भारतात या महिन्यात लाँच होऊ शकतो. या बजेट स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी, MediaTek Helio P22, 6.51-इंचाचा LCD डिस्प्ले यांसारखी फीचर्स असू शकतात. फोनची लाँच तारीख अजून आलेली नाही.

टेक्नो POVA 4 ई-कॉमर्स वेबसाइट Amazon वर सूचीबद्ध केला आहे. हा फोन या महिन्यात लाँच होऊ शकतो. यामध्ये 6000mAh बॅटरी, 18W चार्जिंग, MediaTek Helio G99 प्रोसेसर, 8GB RAM सारखी वैशिष्ट्ये आहेत.

सॅमसंग Galaxy M04 भारतात सॅमसंगच्या सपोर्ट पेजवर लिस्ट करण्यात आला आहे. हा फोन लवकरच भारतात लाँच होणार आहे. मात्र, कंपनीने तारीख जाहीर केलेली नाही. यामध्ये 5000mAh बॅटरी, MediaTek Helio G35 प्रोसेसर, 6.5-इंचाचा HD+ डिस्प्ले यांसारखे फीचर्स मिळतील.

रियलमी 10 Pro Series चे टॉप मॉडेल 8 डिसेंबर रोजी भारतात लाँच केले जाईल. हा फोन MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर, वक्र डिस्प्ले, 12GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज, 108MP कॅमेरा यांसारख्या फीचर्ससह येईल. यात 5000mAh बॅटरी आणि 67W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल.

रियलमी 10 Pro सीरीजचे स्टँडर्ड मॉडेल भारतात 8 डिसेंबर रोजी लाँच केले जाईल. हा फोन Qualcomm Snapdragon 695 प्रोसेसर, 12GB पर्यंत LPDDR4x रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 स्टोरेज, 108MP कॅमेरा यांसारख्या वैशिष्ट्यांसह येईल. यात 5000mAh बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंग सपोर्ट देखील मिळेल
