ताजी बातमी ऑनलाईन टीम
एक नव्हे दोन नव्हे तब्बल पाचव्यांदा चॅम्पियन ठरलेल्या ब्राझिलच्या फुटबॉल संघाने प्री क्वार्टर फायनलमध्ये साऊथ कोरिया संघावर 4-1 अशी मात केली. इतकंच नाही तर ब्राझिलने फीफा विश्व कपच्या क्वार्टर फायनलमध्ये धडक दिली आहे. स्टार युवा फुटबालर नेमार हा ब्राझिलच्या विजयाचा हीरो ठरला. आता क्वार्टर फायनलमध्ये ब्राझिल-क्रोएशिया संघ एकमेकांच्या विरोधात मैदानात उतरणार आहे.
क्रोएशियाने अंतिम 16 च्या सामन्यात जपानवर पेनाल्टी शूटआउटमध्ये विजय मिळवला होता. दुसरीकडे, ब्राझिल तर कायम आघाडीवर असलेला संघ आहे. ब्राझिलने 36 मिनिटांत साऊथ कोरियावर 4 गोल दागले. त्यामुळे साऊथ कोरिया संघाला सामन्याच्या सुरुवातीपासूनच तणावाचा सामना करावा लागला. अखेरपर्यत बाझिलने साऊथ कोरियाला तणावातून बाहेर पडण्याची संधी दिली नाही.
ब्राझिलकडून पहिला गोल विनीशियस ज्यूनिअरने केला. विनीशियस ज्यूनिअरने सामन्याच्या 7 व्या मिनिटांत शानदार गोल करून आपल्या संघाला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर स्टार युवा फुटबालर नेमारची जादू पाहायला मिळाली. नेमार याने सामन्याच्या 13 व्या मिनिटांला पेनाल्टीवरून गोल करून ब्राझिलने दुसरं यश मिळवून दिलं. नंतर 29 व्या मिनिटांला रिचार्लिसनने सेट पीसवरून शानदार गोल करून आपल्या संघाला 3-0 वर पोहोचवलं. रिचार्लिसनच्या या गोलला ‘गोल ऑफ टूर्नामेंट’ असे संबोधण्यात आलं. तर लुकस पकेटाने 36 व्या मिनिटांला गोल करून ब्राझिलला पहिल्या हाफमध्ये 4-0 अशी आघाडी मिळवून दिली.