Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरजुने दानवाड - एकसंबा मार्ग पुन्हा बंद ; नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया!

जुने दानवाड – एकसंबा मार्ग पुन्हा बंद ; नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया!

महाराष्ट्र -कर्नाटकला(karnataka) जोडणारा जुने दानवाड – एकसंबा हा दुधगंगा नदीवरील मार्ग पुन्हा वाहतुकीस बंद करण्यात आला. महाराष्ट्रात कोरणा रुग्ण संख्या वाढत असल्याचे कारण पुढे करत कर्नाटक शासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला.
दुधगंगा नदीवरील पुलावर मोठमोठे दगड मुरूम व काटेरी झुडपे टाकण्यात आली आहेत. त्यामुळे या मार्गावरून होणारी वाहतूक बंद झाली आहे. याशिवाय दत्तवाड – सदलगा हा मार्गही १५ दिवसांपूर्वी बंद करण्यात आला होता.

पण दोन्ही राज्यातील नागरिकांनी बंद केलेल्या मार्गातील एका कोपऱ्यातून दोन चाकी वाहन जाण्याकरता रस्ता केला होता. तो रस्ताही सदलगा प्रशासनाने बंद केला आहे. त्यामुळे कर्नाटकला जाणारा हा मार्गही वाहतुकीस बंद झाला आहे.

कर्नाटक शासनाच्या वतीने वारंवार महाराष्ट्र – कर्नाटकला जोडणारे हे मार्ग बंद होत असल्याने याबाबत महाराष्ट्रातील नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. तर व्हाट्सअप ग्रुप वर “कर्नाटक शासन महाराष्ट्रातील नागरिकांना पाकिस्तानी नागरिक समजतात की काय?” असा मेसेज सर्वत्र व्हायरल होत आहेत.

जुने दानवाड – एकसंबा मार्ग बंद केल्याने शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत. जुने दानवाड येथील अनेक नागरिकांची शेती दुध गंगा नदीच्या पलीकडे आहे. तसेच जनावरांचे गोठे आहेत तसेच दत्तवाड मधील नागरिकांचीही दूध गंगेच्या पलीकडे शेतजमिनी आहेत. त्यामुळे हे दोन्ही मार्ग बंद झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

केंद्र शासनाच्या वतीने राज्य बंदी उठवण्यात आली आहे तर मग कर्नाटक शासनाच्या वतीने महाराष्ट्रातील नागरिकांना बंदी का घालण्यात येत आहे? तसेच या बाबत महाराष्ट्र शासन गप्प का? असा सवाल नागरिकांतून व्यक्त होत आहे. महाराष्ट्र शासनाने ही कर्नाटकातील नागरिकांना महाराष्ट्रात येण्यासाठी बंदी घालावी अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -