आधुनिक तंत्रज्ञानाचं जाळं विस्तारत असताना, सोशल मीडियाने मोठी भरारी घेतली आहे. व्हाॅटस् अॅपसारख्या सोशल माध्यमाशी अनेक कंपन्या कनेक्ट झाल्या असून, त्यामुळे नागरिकांची अनेक कामे अगदी एका क्लिकवर घरबसल्या होत आहेत. या सेवांमध्ये आता ‘एलआयसी’चाही समावेश झाला आहे.
भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात ‘एलआयसी’ने त्यांच्या नोंदणीकृत पॉलिसीधारकांसाठी निवडक ‘इंटर ॲक्टिव्ह व्हाॅटस् अॅप’ सेवा सुरू केल्या आहेत. व्हॉट्स ॲपच्या माध्यमातून ग्राहकांना घरबसल्या ‘एलआयसी’च्या 11 सुविधांचा लाभ मिळणार आहे.
कोणत्या सेवा मिळणार..?
देय प्रीमियम
बोनसची माहिती
धोरणांची स्थिती
कर्जांच्या पात्रतेचे कोटेशन
कार्जाच्या परतफेडीचे कोटेशन
कर्जाचे देय व्याज
प्रीमियम पेमेंट प्रमाणपत्र
युलिप – युनिट्सचे तपशील
एलआयसी सेवा लिंक
सेवा निवडणे/निवड रद्द करणे
संभाषण थांबवणे.
कशी मिळणार सेवा..?
‘एलआयसी’ पोर्टलवर पाॅलिसी नोंदणी केलेल्या पॉलिसीधारकांना व्हॉट्स ॲप सेवेचा लाभ घेण्यासाठी 8976862090 या क्रमांकावर ‘HI’ पाठवावे लागेल. ‘HI’ पाठवल्यानंतर ग्राहक लगेच ‘एलआयसी’च्या व्हॉट्स ॲप सेवेशी कनेक्ट होईल. ग्राहकांना स्क्रीनवर वरील 11 सेवांची यादी दिसेल. गरजेनुसार त्यावर क्लिक करून सेवेचा लाभ घेता येईल.
‘एलआयसी’वर अशी करा नोंदणी
सर्वप्रथमwww.licindia.in
या संकेतस्थळावर ग्राहक पोर्टलवर क्लिक करा. पूर्वी नावनोंदणी केलेली नसल्यास, नवीन वापरकर्ते पर्यायावर क्लिक करा.
नवीन वापरकर्ता’ टॅबवर क्लिक करा, तुमचा युझर आयडी आणि पासवर्ड निवडा, सर्व आवश्यक माहिती भरल्यानंतर तुम्ही नोंदणीकृत पोर्टल युझर व्हाल.