Sunday, December 22, 2024
Homeमनोरंजनलग्नाच्या पहिल्या वाढदिवसासाठी कतरिना-विकी 'पहाडो में'; फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसासाठी कतरिना-विकी ‘पहाडो में’; फोटो शेअर करत अभिनेत्री म्हणाली…

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल 9 डिसेंबर 2022 रोजी त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार आहेत. हा खास प्रसंग आणखी खास बनवण्यासाठी कतरिना आणि विकी गर्दीपासून दूर डोंगरावर क्वालिटी टाईम घालवण्यासाठी गेले आहेत.अलीकडेच कतरिना कैफने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून काही फोटो शेअर केले आहेत ज्यात ती सुंदर दिसत आहे. कतरिनाने याचे श्रेय पती विकी कौशलला दिले आहे. कतरिनाचे सुंदर फोटो पाहून चाहते तिचे कौतुक करत आहेत.

कतरिनाचे हे फोटो तिचा पती विकी कौशलने क्लिक केले आहेत. फोटोंमध्ये कतरिना कैफ जीन्स आणि लूज स्वेटरमध्ये दिसत आहे. कतरिनाला पुन्हा एकदा सैल कपड्यात पाहून चाहत्यांनी ती प्रेग्नंट असल्याचा अंदाज बांधायला सुरुवात केली आहे.

कतरिना कैफ गरोदर असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर चर्चेत आहेत. या वृत्तांमध्ये किती तथ्य आहे, हे येणारा काळच सांगेल. मात्र, अद्याप कतरिना आणि विकीने याबाबत कोणतीही घोषणा केलेली नाही.

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी डिसेंबर 2021 मध्ये लग्न केले. विकी-कतरिना अनेकदा त्यांचे एकत्र फोटो सोशल मीडियावर शेअर करतात, जे चाहत्यांना खूप आवडतात. विकी कौशलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर तो ‘गोविंदा मेरा नाम’ या चित्रपटात भूमी पेडणेकर आणि कियारा अडवाणीसोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

या चित्रपटात भूमी पेडणेकर विकीच्या पत्नीची भूमिका साकारत असून कियारा अडवाणी त्याच्या मैत्रिणीच्या भूमिकेत दिसणार आहे. शशांक खेतान दिग्दर्शित, हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट 16 डिसेंबर 2022 रोजी OTT प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस हॉटस्टारवर प्रदर्शित होणार आहे. कतरिना कैफच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची ‘फोन भूत’ चित्रपटात दिसली होती आणि आगामी काळात कतरिना कैफ ‘टायगर 3’ मध्ये सलमान खानसोबत दिसणार आहे. याशिवाय कतरिना कैफ ‘मेरी ख्रिसमस’ या चित्रपटात विजय सेतुपतीसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -