रूग्णालयाच्या ओपीडीतील खोलीत गळफास घेऊन डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना विश्रामबाग परिसरातील सत्यसाईनगरमध्ये घडली आहे. दरम्यान, या डॉक्टरच्या पत्नीनेही दहा वर्षांपूर्वी आत्महत्या केली असून, डॉक्टरने आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांच्या हाती लागली आहे.
डॉ. संपत विलास पाटील (वय 51, रा. विश्रामबाग, सांगली) असे मृत डॉक्टरचे नाव आहे.
डॉ. संपत पाटील यांची घरातच ओपीडी होती. त्यांची मुलगी परगावी शिक्षण घेत आहे. पाटील यांनी दवाखान्यातील ओपीडीच्या पाठीमागे असणाऱया एका खोलीत दोरीने छताच्या अँगलला गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत माहिती मिळताच, संजयनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. डॉ. पाटील यांनी आत्महत्येपूर्वी लिहिलेली चिठ्ठी पोलिसांना सापडली आहे. त्यात ‘माझ्या आत्महत्येला कुणालाही दोषी धरू नये,’ असे म्हटले आहे.