Tuesday, December 24, 2024
Homeमनोरंजन'सिंघम अगेन'मध्ये दीपिका पदुकोण बनणार लेडी सिंघम; रोहित शेट्टीची मोठी घोषणा

‘सिंघम अगेन’मध्ये दीपिका पदुकोण बनणार लेडी सिंघम; रोहित शेट्टीची मोठी घोषणा

रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सिंघम’ आणि ‘सिंघम रिटर्न्स’ हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान हिट ठरले. आता याच फ्रँचाइझीमधला आणखी एक चित्रपट ‘सिंघम अगेन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

खुद्द रोहितने याची घोषणा केली. अजय देवगणच्या ‘भोला’ या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतर सिंघम अगेनच्या शूटिंगला सुरुवात होणार आहे. रोहित शेट्टीच्या आगामी ‘सर्कस’ या चित्रपटातील ‘करंट लगा’ हे गाणं नुकतंच मुंबईत लाँच करण्यात आलं. या लाँचच्या कार्यक्रमात रोहितने सिंघम अगेनविषयी मोठी घोषणा केली.

सिंघम अगेनच्या चित्रपटासोबतच रोहितने त्यातील मुख्य अभिनेत्रीचाही खुलासा केला. अभिनेत्री दीपिका पदुकोण यामध्ये लेडी सिंघम साकारणार असल्याचं त्याने सांगितलं.

“लोकांना कुठून तरी कळतंच. त्यामुळे मीच सांगतो की कॉप युनिव्हर्समधला आमचा पुढचा चित्रपट सिंघम 3 आहे. दरवेळी मला लोकं विचारतात की लेडी सिंघम कधी येणार? तर आज मी तुम्हाला सांगतो की सिंघम 3 मध्ये लेडी सिंघम असेल आणि दीपिका पदुकोण ती भूमिका साकारणार आहे”, असं रोहितने जाहीर केलं.

2023 मध्ये आम्ही या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करणार आहोत. दीपिकाचं नाव ऐकल्यानंतर रणवीर सिंग म्हणाला, “माझ्याशिवाय तर सिंघम 3 बनूच शकत नाही. त्यामुळे मीसुद्धा त्यात भूमिका साकारणार आहे.”

रोहित शेट्टी आणि दीपिकाने ‘चेन्नई एक्स्प्रेस’ या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. हा चित्रपटसुद्धा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता. आता ‘सिंघम 3’च्या निमित्ताने हे दोघं पुन्हा एकत्र काम करणार आहेत.

रोहित शेट्टीचा ‘सर्कस’ हा चित्रपट ख्रिसमसच्या मुहूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला होता. आता त्यातील ‘करंट लगा’ हे गाणं लाँच करण्यात आलं. या गाण्यात रणवीरसोबत दीपिका झळकणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -