Friday, March 14, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापूर : लिंबूमार आंदोलनातून राज्यपालांचा निषेध, शिवकालीन युद्धनितीचा वापर

कोल्हापूर : लिंबूमार आंदोलनातून राज्यपालांचा निषेध, शिवकालीन युद्धनितीचा वापर

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर : छत्रपती शिवरायांचा अवमान करणारे भगतसिंग कोश्यारी यांची राज्यपालपदावरुन हकालपट्टी करा, या मागणीसाठी शिवभक्त लोकआंदोलन समिती आणि कोल्हापूर जिल्हा दांड-पट्टा, लाठी असोसिएशनने रविवारी अनोखे लिंबूमार आंदोलन केले. यावेळी शिवाजी पेठेतून काढण्यात आलेल्या निषेध मोर्चाला मोठा प्रतिसाद मिळाला.



छत्रपती शिवाजी महाराज की जयच्या घोषणांमध्ये आणि कोश्यारींचा धि:कार करत शिवाजी पेठेतील सरदार तालीम येथून या मोर्चास प्रारंभ झाला. उभा मारुती चौकातून
निघालेल्या या मोर्चाची सांगता निवृत्ती चौकात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केल्यानंतर पारंपारिक शिवकालीन युध्दनितीने लिंबू मार आंदोलनाने मोर्चाची सांगता झाली.

कोल्हापूर जिल्हा दांडपट्टा असोसिएशनचे वस्ताद पंडितराव पोवार, मराठा महासंघाचे कार्याध्यक्ष वसंतराव मुळीक, बबनराव रानगे, शंकर शेळके, श्रीकांत भोसले, नाना सावंत, विनोद साळोखे, सूरज ढोली, अमोल बुचडे, योगेश गुंजेकर उपस्थित होते. निवृत्ती चौकातील लिंबूमार आंदोलनात असोसिएशनच्या रणरागिणी आणि रणमर्द शिलेदारांनी कोश्यारी यांच्या प्रतिमेवर ठेवलेले लिंबू तलवारीने कापून त्यांचा निषेध केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -