Sunday, December 22, 2024
Homeतंत्रज्ञानRedmi Note 12 Pro+ 5G भारतात या दिवशी होणार लॉन्च, 200MP असेल...

Redmi Note 12 Pro+ 5G भारतात या दिवशी होणार लॉन्च, 200MP असेल कॅमेरा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

स्मार्टफोन लवकरच भारतात लॉन्च होणार आहे. नुकतीच या फोनची भारतातील लॉन्च तारीख समोर आली आहे. Redmi Note 12 सीरीजचा एक भाग म्हणून हा स्मार्टफोन चीनमध्ये ऑक्टोबर महिन्यात लॉन्च करण्यात आला होता. या सीरीजमधील Redmi Note 12, Redmi Note 12 Pro, Redmi Note 12 Pro+ आणि Redmi Note 12 Pro Explorer Edition स्मार्टफोन लॉन्च करण्यात आले होते. आता कंपनीन भारतात Redmi Note 12 Pro Plus 5G स्मार्टफोनची लॉन्चिंग डेट जाहीर केली आहे.


Xiaomi च्या मालकीची कंपनी Redmi ने त्यांच्या अधिकृत भारतीय ट्विटर हँडलद्वारे Redmi Note 12 Pro+ 5G च्या भारतातील लॉन्च डेटची पुष्टी केली आहे. हा फोन पुढील वर्षी 5 जानेवारी 2023 रोजी भारतात लॉन्च होईल. Redmi Note 12 Pro Plus 5G हे भारतातील या मालिकेतील सर्वात प्रीमियम डिव्हाइस असेल. या स्मार्टफोनचे सर्वात मोठे फीचर त्याचा पावरफूल 200MP कॅमेरा हे असेल. दरम्यान, या दिवशी Redmi Note 12 Pro Plus 5G स्मार्टफोनसोबत या सीरीजचे इतर डिव्हाइसेस देखील भारतात लॉन्च केले जाऊ शकतात असे मानले जात आहे. परंतु कंपनीने अद्याप यासंबंधी कोणतीही माहिती शेअर केलेली नाही.

Redmi Note 12 Pro+ 5G स्पेसिफिकेशन्स
या मोस्टअवेटेड स्मार्टफोनमध्ये 6.67 इंचचा Full HD+ OLED डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 1080 प्रोसेसर मिळणार आहे. तसेच 12GB LPDDR4X RAM ने हा स्मार्टफोन सुसज्ज असेल. यातील सर्वात जबरदस्त फीचर त्याचा कॅमेरा असेल. कारण यात 200MP चा जबरदस्त कॅमेरा मिळणार आहे. तसेच 5000mAh बॅटरी आणि 120W फास्ट चार्जिंग मिळेल.

चीनी मार्केटमध्ये आधीच लॉन्च
चीनी मार्केटमध्ये हा फोन आधीच लॉन्च करण्यात आला आहे. चायनीज वेरिएंटच्या फाचर्सविषयी बोलायचे झाल्यास Redmi चा हा प्रीमियम डिवाइस MIUI 13 वर काम करतो. यात 6.67 इंचाचा फुल एचडी + OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचे रिझोल्यूशन 1,080×2,400 पिक्सेल आहे आणि रिफ्रेश दर 120Hz आहे. याशिवाय हा फोन MediaTek Dimensity 1080 प्रोसेसरने सुसज्ज आहे. तसेच यात 12GB LPDDR4X रॅम देण्यात आली आहे.

जबरदस्त फोटोग्राफी एक्सपिरियन्स
फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप उपलब्ध आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये OIS सपोर्टसह 200MP चा प्राइमरी कॅमेरा देण्यात आला आहे. यासोबतच 8MP अल्ट्रा-वाइड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो लेन्स देण्यात आल्या आहेत. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी फोनमध्ये 16MP कॅमेरा आहे. फोनची बॅटरी 5000mAh आहे, ज्यामध्ये 120W फास्ट चार्जिंग सपोर्ट उपलब्ध आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -