Sunday, December 22, 2024
Homeसांगलीमिरजेत गाईचे डोहाळेजेवण ते ही जोरात; चौगुले कुटुंबीयांची जोरदार चर्चा ( व्हिडिओ...

मिरजेत गाईचे डोहाळेजेवण ते ही जोरात; चौगुले कुटुंबीयांची जोरदार चर्चा ( व्हिडिओ )

कुणी तरी येणार येणार गं’ म्हणत डोहाळे जेवण भरवले जात असते. मात्र, हेच डोहाळे जेवण एका गाईचे असल्याने आपल्याला नवल वाटेल.


आपण आपल्या घरातील आईवर जेवढे प्रेम करतो तेवढंच प्रेम शेतकरी आजही गाईवर करतो. गर्भवती महिलेच्या पोटातल्या बाळावर गर्भसंस्कार पार पडावेत. म्हणून गर्भवती महिलांची ओटी भरणे अर्थात डोहाळे जेवण कार्यक्रम आयोजित करण्याची आपल्याकडे प्रथा आहे.तसेच मिरजेत स्वामी समर्थ काॅलनीत पार पडला.स्वामी समर्थ काॅलनीतील महेश चौगुले यांनी या लाडक्या गाईचे डोहाळे जेवण घालून एक अनोखा संदेश दिला आहे.डाळीचे पीठ, तेल, आणि शाम्पू लावून गाईला गरम पाण्याने आंघोळ घालण्यात आली.गाईसाठी सोळा प्रकारचा श्रृंगार साज चढवण्यात आला. यात नथ, कंबरपट्टा, मंगळसूत्र, पायातले, सरी बांगड्या, मोत्याची नथ, हळद, कुंकू, कानातले, फुलांचा हार, याचा समावेश करण्यात आला ही संपूर्ण सजावट चौगुले कुटुंबीयांनी केली.त्यानंतर लाडक्या गाईची ओटी भरून औक्षण देखील केले.

यावेळी गाईसाठी वाली, भात, मका, पेंड, गवताचा चारा, लापशी असे दहापेक्षा अधिक खाद्यपदार्थ होते.हौसेला मोल नाही असं म्हटलं जातं, त्याचा अनुभव आपल्याला अनेकदा येत असतो, मिरजेतील स्वामी समर्थ कॉलनीत राहणा-या महेश चौगुले यांनी आपल्या गोठ्यात पाळत असलेल्या गायीचे चक्क डोहाळेजेवण घातले आहे. या गायीच्या डोहाळे जेवणासाठी महेश चौगुले यांनी तब्बल 10 ते 15 हजार रुपये खर्च करून 100 ते 200 लोकांना जेवण घातले. महेश चौगुले यांच्या या उपक्रमाची मिरजेसह आसपासच्या परिसरात चर्चा आहे.तसेच या गाईंच्या डोहाळेजेवणासाठी पाहुणे आणि आसपासच्या परिसरातील महिला यांनी उपस्थिती लावली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -