काँग्रेस नेते आणि मध्य प्रदेशचे माजी मंत्री राजा पटेरिया यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अडचणी वाढत आहेत. त्यांना मंगळवारी सकाळी त्यांना अटक करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांना दमोहमधील हटा शहरातील त्यांच्या राहत्या घरातून अटक केली. त्याचवेळी काँग्रेसने त्यांना कारणे दाखवा नोटीसही बजावली आहे. पटेरिया यांनी ‘पीएमची हत्या’ असे बोलून स्वतःवर संकट ओढावून घेतले आहे. या वक्तव्यानंतर ते भाजप नेत्यांच्या निशाण्यावर आले आहेत.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गृहमंत्री नरोत्तम मिश्रापासून ते प्रदेश भाजप अध्यक्ष व्हीडी शर्मा यांनी या वक्तव्याचा तीव्र निषेध केला आहे. यानंतर, गृहमंत्री नरोत्तम मिश्रा यांच्या सूचनेनुसार, पन्ना पोलिसांनी शांतता भंग आणि असंतोष पसरवल्याबद्दल पटेरियाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. राजा पटेरिया म्हणतात की, मी हत्येबद्दल बोललो नाही, तर पुढच्या निवडणुकीत मोदींचा पराभव करण्याबद्दल बोललो आहे. फ्लोमध्ये माझ्या तोंडून तसे निघाले.
काँग्रेसने पत्रिया यांना नोटीस दिली
याप्रकरणी मध्य प्रदेश काँग्रेसने राजा पटेरिया यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. यासोबतच त्यांची पक्षातून हकालपट्टी का करू नये, याचेही 3 दिवसांत उत्तर देण्यास सांगितले आहे. याआधी काँग्रेसने पटरिया यांच्या वक्तव्याशी आमचा संबंध नसल्याचे म्हटले होते.
काँग्रेस नेत्याने काय म्हटले होते?
राजा पटेरिया रविवारी पन्ना येथे काँग्रेसच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी बोलत होते. व्हायरल व्हिडिओनुसार, यामध्ये ते ‘मोदी निवडणूक संपवून टाकतील. मोदी धर्म, जात, भाषेच्या आधारावर फूट पाडतील. दलित, आदिवासी आणि अल्पसंख्याकांचे जीवन धोक्यात आले आहे. संविधान वाचवायचे असेल तर मोदींच्या हत्येसाठी तयार व्हा, हत्या इन द सेंस हरवण्याचे काम करा.’ असे ते म्हणाले होते.
पटेरिया यांनी दिले होते स्पष्टीकरण
व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजा पटेरिया म्हणाले होते की, ‘पुढील निवडणुकीत भाजपला हरवायचे आहे. असे म्हणायचे आहे पण फ्लोमध्ये असे बोललो. हा व्हिडिओ रेकॉर्ड करणाऱ्या व्यक्तीने केवळ हाच भाग उचलला आहे.’ राजा म्हणाले की, हा व्हिडिओ एडिट करण्यात आला आहे. मला असे म्हणायचे नव्हते. माझ्या विधानाचा विपर्यास करून मांडण्यात आले.’