Wednesday, August 6, 2025
Homeसांगलीमिरज तालुक्यातील सोनी येथे तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून ;...

मिरज तालुक्यातील सोनी येथे तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून ; संशयित तीन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात.

ताजी बातमी ऑनलाईन टीम


 मिरज तालुक्यातील सोनी येथे मंगळवारी मध्यरात्री आकाश माणीक नरुटे (वय २२) या तरुणाचा धारदार हत्याराने डोक्यात वार करुन खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याचा संशय असून याप्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले आहे.घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस निरीक्षक नारायण देशमुख व कर्मचारी.सोनी गावात ग्रामपंचायत निवडणूक सुरु असून राष्ट्रवादीच्या निवडणूक प्रचारात असलेल्या आकाश यास दोघांनी बोलावून दुचाकीवर बसवून नेले.

त्यानंतर रात्री उशिरापर्यंत आकाश याचा मोबाइल बंद असल्याने त्याची शोधाशोध केल्यानंतर रात्री बारा वाजता गावाजवळ करोली रस्त्यावर इंग्लिश स्कूलच्या मैदानावर आकाश याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे आढळले.आकाश याच्या डोक्यात पाठिमागील बाजूस व पाठिवर धारदार हत्याराने अनेक वार केल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला होता. भावासोबत शेती करणारा आकाश हा पैलवान होता. त्याचे काही दिवसापूर्वी गावातील काही जणांसोबत भांडण झाले होते. त्यातून हा प्रकार घडल्याचा संशय आहे. मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -