Thursday, August 7, 2025
Homeकोल्हापूरग्रामपंचायत निवडणूक 2023 : येथे लिंबू, मिरच्या, काळ्या बाबल्याचे प्रकरण वाढले!

ग्रामपंचायत निवडणूक 2023 : येथे लिंबू, मिरच्या, काळ्या बाबल्याचे प्रकरण वाढले!

ताजी बातमी ऑनलाईन टीम

कोल्हापूर 431 ग्रामपंचायतींसाठी निवडणुकीचा जोरात सुरु आहे. त्यामुळे गावगाड्यावर ऊसतोडीसह प्रराचाला सुद्धा रंगत वाढत चालली आहे. आज उमेदवारांकडून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्यासाठी चांगलीच ताकद लावली जात आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यात 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून सर्वाधिक पन्हाळा तालुक्यात 10 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.



ग्रामपंचायत निवडणुकीत लिंबू, मिरच्या अन् काळ्या बावल्या सुद्धा जोरात दरम्यान, प्रचार एका बाजूने शिगेला पोहोचला असतानाच प्रतिस्पर्धी अंधश्रद्धेच्या माध्यमातून नामोहरम करण्यासाठी सुद्धा चांगलेच प्रयत्न सुरु आहेत. गावगाड्यावर उतारा टाकण्यावर अजूनही विश्वास ठेवला जातो, हे प्रकर्षाने दिसून येत आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या दारात, लिंबू, मिरच्या, काळ्या बावल्या गुलाल लावलेल्या दिसून येत आहेत. यातून काय साध्य होणार हा संशोधनाचा मुद्दा असला, तरी ज्यांच्या मनात मिक भीती यांना अधिकच भीतीच्या छ… साडण्याचा हा केविलवाणा प्रयत्न असल्याचा शक्यता नाकारता येत नाही.



भावनेच्या राजकारणाला जोर
ग्रामपंचायतीचे राजकारण हे पूर्णत: स्थानिक मुद्यांवर आणि भावनिक होत असते. त्यामुळे परडीवर हात मारायला लावणे, शपथ घालणे, रानाला बांध लागून असेल, तर त्याची भीती घालणे, सेवा संस्था असेल, तर त्याची भीती घालणे, दूध संस्था असल्यास त्याची भीती घालणे, असे प्रकारही सर्रास घडून येतात. त्यामुळे एक भावनेचा बाजार सर्वाधिक मांडला जातो.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -