Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापुरातील नवरदेवाचा वरातीदरम्यान गर्दीतच गोळीबार!

कोल्हापुरातील नवरदेवाचा वरातीदरम्यान गर्दीतच गोळीबार!

लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस असतो. हा दिवस आणखी खास बनावा यासाठी नवरी आणि नवरदेव काहीतरी खास आणि हटके करण्याच्या प्रयत्नात असतात.
मात्र, कधीकधी उत्साहाच्या भरात ते असं काही करतात, ज्यामुळे चांगलेच अडचणीत येतात. अशीच एक घटना नुकतीच कोल्हापुरमधून समोर आली आहे. या घटनेत नवरदेवाने चक्क वरातीमध्येच गोळीबार केला. ही घटना कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील सडोली येथे घडली.

यात नवरदेवाने वरातीत चक्क बारा बोअरच्या बंदुकीने हवेत गोळीबार केला आहे. मात्र, हा प्रकार नवरदेवाला चांगलाच भोवला आहे. या प्रकरणी नवरदेव अजयकुमार पवार याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

मात्र त्याचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये दिसतं, की नवरदेवाच्या आसपास भरपूर गर्दी आहे. हे सर्व लोक वरातीमध्ये नाचण्याचा आनंद घेत आहे. काही तरुणांनी नवरदेवाला आपल्या खांद्यावर उचललं आहे.

नवरदेवाच्या हातामध्ये बंदुक आहे आणि तो याने हवेत गोळीबार करत आहे. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर मात्र नवरदेव अडचणीत आला आहे. वरातीत उपस्थित असणाऱ्याच कोणीतरी हवेत गोळीबार केलेल्या या घटनेचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. याबाबत माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी नवरदेव अजयकुमार पवार याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलीस सध्या या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -