Sunday, December 22, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर - निकालाचा पहिला कल हाती ; मुश्रीफांना दे धक्का !

कोल्हापूर – निकालाचा पहिला कल हाती ; मुश्रीफांना दे धक्का !

ग्रामपंचायत निवडणूक बामणीमध्ये समरजीत घाटगे आणि राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ गटामध्ये कांटे की टक्कर होती. या ठिकाणी कोणतीही निवडणूक असली तरी दोन गटामध्ये जोरदार रस्सीखेच सुरू होते. ग्रामपंचायत निवडणुकीमध्येही घाटगे गटाने बाजी मारली आहे. सरपंचपद पटकावले आहे. भाजपचे नेते समरजीत घाटगे यांनी तीन ग्रामपंचायतीमध्ये आपलं वर्चस्व स्थापन केला आहे.

कोल्हापूरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचा निकालाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे. निकालाचा पहिला कल हाती आला आहे. कागल तालुक्यातील बामणीत भाजपने गुलाल उधळला आहे. बामणीमध्ये सत्तांतर झाले आहे.

तसंच, बामणी निढोरी आणि रणदिवेवाडी या कागल तालुक्यातील तीनही गावात भाजपचा झेंडा आहे. कागल तालुक्यात भाजपची घोडदौड सुरूच आहे. तसंच कसबा सांगाव ता. कागल मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. सरपंचपदी राजे – मंडलिक गटाने बाजी मारली आहे. करवीर तालुक्यातील कावणे गावात भाजपने झेंडा फडकावला आहे. कागलनंतर करवीरमध्ये भाजपने खाते खोलले आहे. करवीर तालुक्यात कावणे गावी शुभांगी प्रतापसिंह पाटील (भाजप) सरपंचपदी निवड झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 429 ग्रामपंचायतीसाठी रविवारी मतदान पार पडले. या निवडणुकीसाठी 1193 उमेदवार सरपंचपदासाठी नशीब आजमावत आहेत तर 8 हजार 995 उमेदवार सदस्य पदासाठी रिंगणात आहेत.

कोल्हापूर बिनविरोध ग्रामपंचायत चित्र
एकूण 43
स्थानिक विकास आघाडी : 14
जनसुराज्य शक्ती: 10
काँग्रेस: 3
राष्ट्रवादी काँग्रेस: 7
शिवसेना ठाकरे गट: 3
शिवसेना शिंदे गट: 6

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -