Sunday, February 23, 2025
Homeकोल्हापूरकोल्हापुरच्या व्यावसायिकाला पुणेरी भामट्यानेगंडवले

कोल्हापुरच्या व्यावसायिकाला पुणेरी भामट्यानेगंडवले

कोल्हापूर येथे चांदी विक्रीचा व्यवसाय असलेल्या व्यावसायिकाला पुणेरी भामट्याने फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यात 14 किलो चांदीच्या दागिन्यांची ऑर्डर घेऊन आलेल्या व्यावसायिकाकडून चार लाख रुपये किंमतीचे 14 किलो वजनाचे दागिने घेऊन भामटयाने पळ काढला आहे.
याप्रकरणी इमरान ऊर्फ मुन्ना महंमद शेख (वय-40, रा. कोल्हापूर) यांनी उत्तमनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

ही घटना 19 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते दीड वाजण्याचे दरम्यान शिवणेतील साहिल रेसीडन्सी, पहिला माळा येथे घडली आहे. तक्रारदार इमरान शेख यांचा कोल्हापूर येथे चांदी विक्रीचा व्यवसाय आहे. त्यांना आरोपी जगदीश चौधरी याने फोन करुन 25 किलो चांदीचे पैंजण व घुंगरुची ऑर्डर दिली होती. त्यातील तयार असलेले आठ किलो वजनाचे घुंगरु आणि सहा किलो वजनाचे पैंजण असा 14 किलो चांदीचा माल घेऊन ते कोल्हापूर येथून पुण्यातील शिवणे परिसरात आले होते. माल घेऊन ते आरोपीच्या घरी गेले असता, आरोपी माल घेऊन व्यवहाराचे पैसे न देता आर्थिक फसवणूक करत पळून गेला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -