यंदा निसर्गाचा लहरीपणा समजेनासा झाला आहे. कधी थंडी, तर कधी उकाडा, अशा बदलत्या वातावरणाचा अनुभव येत आहे. मात्र, लवकरच थंडीचा कडाका वाढण्याची शक्यता आहे.
गोंदियात सर्वात कमी तापमान
राज्यात सर्वात कमी तापमानाची नोंद विदर्भात झाली असून, गोंदियामध्ये कमाल तापमान 29.4 अंश, तर किमान तापमान 10.4 अंशावर आहे. नागपुरातही पारा उतरला असून, नाशिक, पुणे, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातील तापमानातही मोठी घट झाली आहे.
महाराष्ट्रातही तापमानात घट झाली असली, तरी वातावरणात संमिश्र बदल जाणवत आहेत. राज्यातील काही भागांमध्ये 15 ते 20 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. नाशिक, पुणे, औरंगाबादमध्ये तापमान घटले आहे. रब्बी पिकांसाठी ही थंडी चांगली असल्याचे बोलले जाते.
उत्तर भारतात थंडी वाढली असली, तरी महाराष्ट्राच्या शेजारील राज्य असलेल्या कर्नाटक, केरळ, नागालँड या राज्यांमध्येही हलका पाऊस झाला आहे. इशान्य भारतातही पावसाचा शिडकाव होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.