दिव्यांगांसाठी मंत्रालय करणारे पहिले राज्य आहे. सात कोटी लोकांना रेशनचं दिवाळीचा शिधा वाटप केला. चार वस्तू १०० रुपयांत दिला. चीनमध्ये कोविड आलंय. धानासाठी हेक्टरी १५ हजार रुपयांचा बोनस जाहीर केला. याचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यावर जाणार आहेत. त्यामुळं कोणालाही पैसे खायला मिळणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे विधानसभेत बोलत होते. अतिवृष्टीग्रस्तांना पाच हजार कोटींची मदत केली. राज्यात ७०० बाळासाहेब ठाकरे रुग्णालये सुरू करतोय. मुंबईत ५२ दवाखाने सुरू केले. ठाण्याला त्याची सुरुवात केली. त्यातून सर्वसामान्यांना मोफत औषध, मोफत ट्रीटमेंट मिळणार आहे. १४७ प्रकारच्या मोफत तपासण्या केल्या जाणार आहेत. जलयुक्त शिवार योजना पुन्हा सुरू केली. शेतकऱ्यांना याचा फायदा होईल. ७५ हजार शासकीय नोकऱ्या देण्याचा निर्णय आपल्या सरकारनं घेतला, असंही त्यांनी सांगितलं.
अजित पवार रोखठोक भूमिका घेतात. पण, काल ते सत्याच्या बाजूनं उभे राहिले नाहीत. जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणण्याचं काम तुम्हाला करायला पाहिजे होतं, असा टोलाही मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला. विदर्भासाठी अडीच वर्षात कोणता निर्णय घेतला असा सवाल मुख्यमंत्री शिंदे यांनी महाविकास आघाडी सरकारला केला.
विरोधकांनी मागणी केली नसताना धानाला बोनस दिला हे आमचं सरकार आहे. शेतकऱ्याला जे पाहिजे ते देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे. विदर्भातील शेतकरीही चांगल्या गाडीत गेला पाहिजे. शेतकऱ्यानंसुद्धा हेलिकॅप्टरनं फिरलं पाहिजे. तालुकानुसार हेलिपॅड करायचंय. अचानक आरोग्य, अपघात झाल्यास एअर अम्बुलन्सनं आणता येऊ शकतो.
हेलिकॅप्टरनं मुख्यमंत्री कसा फिरतो, असं मला हिनवण्यात आलं. हेलिकॅप्टरनं शेतात जाणार मुख्यमंत्री दाखवा, असं मला हिनवण्यात आलं. आता शेतकरीसुद्धा हेलिकॅप्टरनं फिरणार असल्याचं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.