Monday, February 24, 2025
Homeकोल्हापूरसाडेतीन तोळे सोन्याची चोरी; दुसरीकडे चोरीचा प्रयत्न फसला

साडेतीन तोळे सोन्याची चोरी; दुसरीकडे चोरीचा प्रयत्न फसला

बच्चे सावर्डे ता. पन्हाळा येथे शुक्रवार दि. ३० रोजी पहाटे २ च्या सुमारास मागल्या दाराची कडी तोडून साडेतीन तोळे सोने, व रोख ४५०० रूपयावर चोरट्यानी डल्ला मारला. त्यानंतर एका घरात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. पण घरातील लोक जागे झाल्याने चोरट्यांनी पळ काढल्याने चोरीचा प्रयत्न फसला.

बच्चे सावर्डेत गुरव गल्लीतील बंडू तुकाराम महाडिक यांच्या घरातील मागील दाराची कडी तोडून मागील खोलीत असणाऱ्या कपाटातील सोन्याची फुले, रिंगा यासह सुमारे साडेतीन तोळे सोने व रोख ४५०० रू. लांबवले.

यांचे घरी चोरट्यानी चोरीचा प्रयत्न केला. चोरट्यानी घरात प्रवेश करून तिजोरीत साडी खाली असलेली चावी घेवून ते लॉकर उघडण्याचा प्रयत्न करीत होते. तेवढ्यात कुंटूबात सर्वजण सावध झालेने चोरटे मांगलेच्या दिशेने पळुन जाण्यात यशस्वी झाले.

कोडोली पोलीस ठाणेत घटनेची माहिती मिळाल्यावर सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड व कर्मचारी, ठसे तज्ञ यांनी पंचनामा करून तपासाला सुरवात केली. श्वान पथकाने देखील फारसा चोरट्यांचा मार्ग काढला नाही. बघ्यांच्या गर्दीमुळे श्वान पथकास मार्ग काढता आला नाही. गावातील चोरीची वार्ता पसरताच सकाळ पासून सायंकाळ पर्यंत बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली होती. पोलीस पाटील सागर यादव यांनी घटना स्थळी उपस्थित राहून पोलीसांना सहकार्य करीत होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -