सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्ष 2023 चं स्वागत करण्यासाठी प्रत्येकजण सज्ज झाले आहे. नववर्षाच्या स्वागतापूर्वी चालू वर्षाला निरोप देण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. नववर्षाच्या स्वागताचे सर्वांना वेध लागले आहे. कोरोना संकटानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईकर नववर्षाचे जोरदार आणि जल्लोषात साजरा करणार आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूरात जय्यत तयारी सुरु आहे. कोल्हापुरात आज थर्टी फर्स्ट आणि नववर्षाच्या स्वागतासाठी आज पब पहाटे पाचपर्यंत सुरु राहणार आहे. कोल्हापुरात आज ‘थर्टी फर्स्ट’साठी बार पहाटे पाचपर्यंत तर महापालिकेची गार्डन रात्री 12 पर्यंत सुरु राहणार आहेत.
कोल्हापूर शहरातील रंकाळा तलाव उद्यान, पदपथ उद्यान, पद्माराजे उद्यान, नाळे उद्यान, शेळके उद्यान, पद्मावती उद्यान, मंगेशकर उद्यान, नेहरू बालोद्यान, रंकाळा चौपाटी, शाहू उद्यान, राजाराम हॉल उद्यान, दादासो शिर्के उद्यान, महावीर उद्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यान, नाना-नानी पार्क, ताराबाई पार्क उद्यान, लालबहाद्दूर शास्त्री उद्यान, मुक्त सैनिक उद्यान, रुईकर ओपन उद्यान, सम्राटनगर उद्यान, टेंबलाई उद्यान, श्रीराम उद्यान, हुतात्मा पार्क उद्यान यांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील सर्वच बिअर बार आणि परमीट रुम, देशी-विदेशी विक्री केंद्रावर दारू पिण्याचा हा एकदिवसीय परवाना उपलब्ध करून देण्यात आला आहे. हे परवाने दुकानांत उपलब्ध आहेत. त्यामुळे रात्री अकरा-साडेअकरापर्यत खुले असणारे परमीटरूम बिअर बार 31 डिसेंबरला पहाटे पाचपर्यंत खुले राहतील