Tuesday, July 29, 2025
Homeसांगलीथर्टी फर्स्टसाठी या ठिकाणी ४५ हजार परवाने वितरीत

थर्टी फर्स्टसाठी या ठिकाणी ४५ हजार परवाने वितरीत

सरत्या वर्षाला निरोप आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यात ४५ हजार मद्यप्राशन परवाने वितरीत झाल्याची माहिती दारु बंदी व उत्पादन शुल्क अधीक्षक संध्याराणी देशमुख यांनी दिली.सीमावर्ती भागामध्ये चोरटी मद्य वाहतूक रोखण्यासाठी पाच भरारी पथके नियुक्त करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.

करोना कालावधीनंतर सामूहिक कार्यक्रमासाठी खुलेपणा मिळाला असल्याने हॉटेल, ढाबे याठिकाणी थर्टी फर्स्ट साजरा करण्यासाठी मोठा उत्साह आहे. काही हॉटेल चालकांनी ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विद्युत रोषणाई केली आहे. तर, मद्य विक्री केंद्रावर मद्यासोबत चकणा मोफत देऊ केला आहे. अवैध मद्य विक्री, वाहतूक आणि विनापरवाना मद्य प्राशन रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभाग सतर्क झाला असून भरारी पथकाद्वारे कारवाई केली जात असल्याचे श्रीमती देशमुख यांनी सांगितले.

म्हैसाळ ( ता.मिरज) व जत तालुक्यात उमदी, कवठेमहांकाळ तालुक्यातील नागज येथे सीमेवर वाहन धारकांची झाडाझडती घेण्यात येत आहे. कर्नाटक व गोवा राज्यातून मद्याची चोरटी आयात रोखण्यासाठी रेल्वे पोलीसांची मदत घेण्यात येत आहे. एक दिवसीय मद्यपरवाना घेण्यासाठी देशी दारुकरीता दोन तर विदेशी मद्यासाठी पाच रुपये परवाना फी आकारण्यात येत असल्याचे श्रीमती देशमुख यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -