Tuesday, July 29, 2025
Homeमनोरंजनगौतमी पाटीलचा नाद खुळा, छेड काढणाऱ्याला गर्दीत घुसून शिकवला धडा

गौतमी पाटीलचा नाद खुळा, छेड काढणाऱ्याला गर्दीत घुसून शिकवला धडा

टिकटॉक स्टार आणि लावणी कलावंत गौतमी पाटील गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. तिच्या डान्सवर महाराष्ट्रातून टीका केली जात असून अश्लील नृत्यावर बंदी घालावी अशी मागणी देखील होत आहे.असे असले तरीही तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होताना दिसत आहे.

गौतमी पाटील हिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये भर कार्यक्रमामध्ये छेड काढणाऱ्या तरुणाला गौतमी पाटील हिने चांगलाच धडा शिकवल्याचे समजते.

चूक झाली, पण…

दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना गौतमी पाटील हिने पूर्वी आपल्याकडून चूक झाल्याचे मान्य केले. पूर्वी माझ्याकडून चूक झाली, हे मी मान्य करते. पण तेव्हापासून माझा पदर नीट असतो, मी केस मोकळे सोडत नाही. मी काहीही अश्लील डान्स करत नाही. त्यामुळे आता माझ्या कार्यक्रमांबद्दल आक्षेप घेण्याचे काहीच कारण नाही, असे ती म्हणाली.

सोलापुरात तुफान गर्दी

सोलापूरमधील नातेपुते गावात गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमाला अबाल-वृद्धांसह तरुणांची प्रचंड गर्दी झाली होती. या कार्यक्रमात प्रेक्षकांना बसण्यासाठी खुर्च्या ठेवल्या होत्या. पण खुर्च्या कमी आणि गर्दी अधिक अशी अवस्था झाली. बसायला जागाच नसल्याने तरुणांनी खुर्च्या फेकल्या अन् मिळेल तिथे उभे राहुन कार्यक्रमाचा अस्वाद घेण्यास सुरुवात केली. गर्दीला आवर घालण्यासाठी कार्यक्रमस्थळी बॅरिकेटिंग करण्यात आले होते. तरुणांनी बॅरिकेटींग तोडून आत प्रवेश केला. यावरून गर्दी किती होती याचा अंदाज येईल. गौतमीचा कार्यक्रम सुरू असतानाच हा कल्ला सुरू होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -