Friday, June 21, 2024
Homenewsव्याजाच्या पैशावरून व्यवसायिकाला पाजले विष: दोघांविरोधात गुन्हा दाखल...

व्याजाच्या पैशावरून व्यवसायिकाला पाजले विष: दोघांविरोधात गुन्हा दाखल…

औरंगाबाद व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही दोघांनी व्यवसायिकाला मारहाण करत विष पाजवल्याची घटना 11 ऑगस्ट रोजी साडेतीन वाजेच्या सुमारास चिकलठाण्यातील हिनानगर भागात उघडकीस आली आहे. याबाबत व्यवसायिकाच्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


चिकलठाणा भागातील भारत देवराव घोरपडे, वय 36, रा. सावित्रीनगर हे प्लॉट खरेदी-विक्रीचा व्यवसाय करतात. त्यांनी 2018 मध्ये सावकार राजू बरंडवाल (रा. हिनानगर) आणि राधा उजगरे यांच्याकडून दोन लाख रुपये व्याजाने घेतले होते. त्यानंतर सलग दोन वर्ष घोरपडे यांनी व्याजासकट साडेपाच ते सहा लाख रुपये दिले. तरीही त्यांच्याकडे साडेचार लाखांची मागणी केली जाऊ लागली. तसेच आरोपींनी व्यवसायिकाकडून चार कोरे चेकही घेऊन ठेवले होते.


त्यानंतर बरंडवाल घोरपडे यांना भेटला तेव्हा त्याने एक ऑगस्ट रोजी साडेचार लाखांचा चेक (cheque)बँकत बनविण्यासाठी टाकणार असल्याचे धमकावले. तसेच दसरा चेक 10 ऑगस्ट रोजी बैंकत टाकण्यात आला. हे दोन्ही चेक रक्कम नसल्यामुळे वटले नाहीत.

त्यामुळे दोन्ही आरोपींना 11 ऑगस्ट रोजी घोरपडे यांना फोन करून घरी असल्याची खात्री केली. त्यानंतर दुपारी त्यांचे घर गाठले साडेचार लाखांची मागणी करीत घोरपडे यांच्याशी वाद घालून त्यांना बरंडवाल याने जमिनीवर पाडले. तर उजगरे हिने पर्समधून विषारी विष काढून बळजबरी पाजले. त्यानंतर घोरपडे यांच्या घराला कुलूप लावले. हा प्रकार घडल्यानंतर नातेवाईकांनी घोरपडे यांना तात्काळ घाटीत दाखल केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -