आमदार हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडी ने केलेल्या छापेमारीच्या प्रतिक्रिया कोल्हापूर जिल्ह्यात विविध ठिकाणी उमटल्या. हातकणंगलेमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून राज्य सरकार आणि केंद्र सरकारचा निषेध करून त्याविरोधात घोषणा देण्यात आल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व नविद मुश्रीफ विचारमंच हातकणंगले तालुका, यांच्यावतीने ही निदर्शने करण्यात आली. यावेळी केंद्र सरकार व राज्य सरकारच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या. यावेळी नविद मुश्रीफ विचारमंच चे अध्यक्ष संदेश भोसले, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्याध्यक्ष राम कांबळे, विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अविनाश गुरव, जिल्हा सरचिटणीस विवेक जाधव, विद्यार्थी सेलचे अमन जमादार, अर्शद नायकवडी, सादिक फरास, अक्षय लोंढे, अक्षय चौगले, हर्षद शिखरे, आशिष सनदे इ. पदाधिकारी उपस्थित होते.