Friday, November 22, 2024
Homeकोल्हापूरकिरीट सोमय्यांचं हसन मुश्रीफ यांना चॅलेंज; "कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेणार, रोखून...

किरीट सोमय्यांचं हसन मुश्रीफ यांना चॅलेंज; “कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेणार, रोखून दाखवा.’

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या घरावर ईडीकडून छापेमारी करण्यात आली आहे. हसन मुश्रीफ यांच्या कागलमधील घरावर तसेच पुणे येथील कार्यालयांवर यावेळी छापे टाकण्यात आले होते.तब्बल 12 तास मुश्रीफांच्या घरी छापेमारी सुरू होती.

सकाळी सात वाजता सुरू झालेला तपास सायंकाळी सात वाजता संपला. यानंतर राज्यभरातून विरोधी पक्ष नेत्यांच्या संतप्त प्रतिक्रिया समोर येण्यास सुरुवात झाली होती. यावेळी अनेक राजकीय नेत्यांनी सत्ताधारी पक्षांवर टीका केल्याचं यावेळी दिसून आलं.

दरम्यान, अश्यातच आता भाजप नेते किरीट सोमय्या यांनी “कोल्हापुरात येऊन महालक्ष्मीचे दर्शन घेणार आहे. रोखायचे असेल, तर रोखून दाखवा’, असे आव्हान दिले आहे. कोल्हापूरला सर्वप्रथम आई लक्ष्मी मातेचे दर्शन घेण्यासाठी जात आहे. त्यामुळे मी मुश्रीफ यांना चॅलेंज करतो, त्यांनी आता मला रोखूनच दाखवावे.

मागच्या वेळी माफिया सरकार होते. त्यामुळे मला रोखले गेले होते. आता मला तुम्ही रोखू शकत नाही. मी येत आहे….” असे आव्हान किरीट सोमय्या यांनी मुश्रीफ यांना केलं आहे. मात्र, आता भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या या आव्हानाला हसन मुश्रीफ आणि त्यांचे संतापलेले कार्यकर्ते कश्या प्रकारे उत्तर देणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, हसन मुश्रीफ यांच्या बंगल्यावर तसेच सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना आणि शहरातील माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर यांच्या बंगल्यावर एकाचवेळी छापेमारी करण्यात आली. यावेळी घराला आणि परिसरात पोलिसांकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -