Saturday, April 4, 2026
Homeमहाराष्ट्रथंडीनंतर आता राज्यात पडणार पाऊस!

थंडीनंतर आता राज्यात पडणार पाऊस!

पुढील दोन ते तीन दिवस राज्यात पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. सध्या राज्यात थंडीचा जोर आहे. अशातच हवामान विभागानं पावसाचा इशारा दिला आहे.पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

उत्तर आणि पूर्व भागातून येणाऱ्या वाऱ्यांमुळं कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यानं तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. गुरुवारी देखील काही ठिकाणी तुरळक पावसाने हजेरी लावली होती. पावसामुळे राज्यातील किमान तापमानात वाढ होणार असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे.

29 जानेवारीनंतर महाराष्ट्रात थंडीचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागानं गुरुवारी (26 जानेवारी) वर्तवला होता.राज्यात सातत्यानं वातावरणात बदल होत आहे. कधी थंडीचा जोर तर कधी पावसाची हजेरी अशी स्थिती निर्माण होत आहे.

उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. बदलत्या हवामानाचा शेती पिकांना मोठा फटका बसला आहे. पिकांवर विविध रोगांचा परिणाम होत आहे. त्यामुळं राज्यातील शेतकरी चिंतेत आहेत.

राज्यात सातत्यानं हवामान बदलत आहे. कधी थंडी तर कधी पाऊस पडत आहेत. या बदलत्या वातावरणाचा आरोग्यावरही परिणाम होत आहे. पुढील दोन ते तीन दिवस राज्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -