Wednesday, August 27, 2025
Homeमनोरंजनआर्चीनं केला बाॅयफ्रेंडबद्दल खुलासा; म्हणाली की, माझ्या आयुष्यात….

आर्चीनं केला बाॅयफ्रेंडबद्दल खुलासा; म्हणाली की, माझ्या आयुष्यात….

मराठी चित्रपट ‘सैराट’ मधून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलेल्या आर्ची अर्थात रिंकू राजगुरूंच्या प्रेक्षकांना चांगलंच वेड लावलं. अजूनही या चित्रपटाची क्रेझ आर्चीच्या चाहत्यांंमध्ये कायम आहे. या चित्रपटातील कलाकारांनाही प्रेक्षकांची अमाप पसंती मिळाली. ‘मराठीत सांगितलेलं कळत नाय का इंग्लिशमध्ये सांगू काय,’ हा आर्चीचा डायलॉग तर प्रसिद्ध झाला. या आर्चीने आता आपल्या बॉयफ्रेंडबाबत एक खुलासा केला आहे.

सैराटमधून एक ग्रामीण भागातील तरुण व तरुणीच्या प्रेमकहाणीने सर्वांनाच वेड लावले. यातील गाण्यांची आजही भुरळ प्रेक्षकांना पडत आहे. यातील आर्ची अर्थात रिंकू राजगुरू हिला अनेक चित्रपटाच्या व वेब्सिरीजच्या ऑफरही आल्या. शिवाय तिने त्यामध्ये कामही केलं. आता ती पुन्हा का कारणाने चर्चेत आली आहे. तिने एका युट्युब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत आपल्या बॉय फ्रेंडबाबत एक खुलासा केला आहे.

यावेळी रिंकूने बॉयफ्रेन्डबाबत म्हंटले आहे की, अजूनतरी माझ्या आयुष्यात कोणता मुलगा नाही. ज्या दिवशी माझ्या आयुष्यात कोणी येईल, त्या दिवशी मी जाहीर करेन. त्यात लपवण्यासारखं काय आहे. रिंकूच्या या खुलास्यानंतर आता परश्या म्हणजेच आकाश ठोसर आणि रिंकूनं खऱ्या आयुष्यातही एकत्र यावं, अशी इच्छा नेटकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -