Friday, February 7, 2025
Homeमनोरंजनआईच्या निधनानंतर Rakhi Sawant ला आली Salman Khan ची आठवण, म्हणाली...

आईच्या निधनानंतर Rakhi Sawant ला आली Salman Khan ची आठवण, म्हणाली…

ताजी बातमी ऑनलाईन टीम

बॉलिवूडची ड्रामा क्वीन अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत यांचं काल शनिवारी 29 जानेवारी निधन झालं. राखीची आई जया यांच्यावर मुंबईमधील रुग्णालयात ब्रेन ट्युमरवरील उपचार सुरु होते. मुंबईतील क्रीकेअर रुग्णालयामध्ये जया सावंत यांनी अखेरचा श्वास घेतला मागील काही दिवसांपासून राखी सातत्याने तिच्या आईच्या तब्बेतीसंदर्भातील अपडेट्स शेअर करत होती. राखीने रुग्णालयामधील व्हिडीओ शेअर करत आईवर उपचार सुरु असल्याचं तिच्या चाहत्यांना सांगितलं होतं. राखीनं तिच्या चाहत्यांना आपल्या आईसाठी प्रार्थना करावी अशीही विनंती केली होती. मात्र, काल राखीच्या आईचं उपचादारादरम्यान निधन झालं. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून जया सावंत यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु होते. त्यानंतर राखीचा आता एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत राखीला बॉलिवूड अभिनेता सलमान खानचीही आठवण आली आहे.

राखीचा हा व्हिडीओ इन्स्टंट बॉलिवूड या सेलिब्रिटी फोटोग्राफरच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओत आपण पाहू शकतो की आईला रुग्णालयातून घेऊन जात असताना राखी खूप रडते. या दरम्यान, सलमान खानची आठवण करत राखी म्हणाली, सलमान भाई मां मर गई. राखी सतत हे वाक्य परत परत बोलताना दिसली.

राखीच्या आईला तीन वर्षांपूर्वी कॅन्सरची बाधा झाली होती. कॅन्सरवर मात केल्यानंतर त्यांना ब्रेन ट्यूमर झाल्याचं समोर आलं आणि त्यावरील उपचार सुरु करण्यात आले. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी (Mukesh Ambani) हे आईच्या उपचारांसाठी मदत करत असल्याचंही सांगितलं होतं. “मी अंबानी यांचे आभार मानते. अंबानीजी माझ्या आईवर उपचार करण्यासाठी मदत करत आहेत. रुग्णालयामधील सध्या जे दर आहेत त्यापेक्षा कमी दरात त्यांच्या मदतीमुळे माझ्या आईवर उपचार सुरु आहेत,” असंही राखी म्हणाली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -