ताजी बातमी ऑनलाईन टीम
“मी एका महिलेचा खून केला आहे. तिला तुम्हीच शोधून काढा. ते तुमचं काम आहे,” असे एका माथेफिरूने पोलिसांना फोन करून सांगितले आणि त्यांना आव्हान देत चक्रावून सोडले. त्याच्या सांगण्यावरून पोलिसांची वाघबीळ घाटाचा डोंगर शोधला; परंतू मृतदेह कोठेही आढळून आला नाही. घटनास्थळी रक्ताने माखलेले अंथरूण, जागोजागी पडलेले रक्ताचे डाग आणि माथेफिरूचे हातात धारधार विळा घेऊन रस्त्यावरील वाहनधारकांच्या पाठिमागे लागणे खूनाचा केलेला बनाव. वाघबीळ घाटात माथेफिरूने घातलेल्या गोंधळामुळे पोलिसांसह सर्वांची झोप उडवून टाकली होत या घटनेची करवीर पोलीस ठाण्यात नोंद केली आहे.
अधिक माहिती अशी, कोल्हापूर-रत्नागिरी रोडवरील वाघबीळ घाटातील चिले मंदिराजवळ शनिवारी (२८ जाने.) सकाळी बाराच्या सुमारास प्रविण विष्णू कांबळे (वय ३०, चिखली, ता. शिराळा, जि. सांगली) हा माथेफिरू तरूण हातात विळा घेऊन, ‘मी एका महिलेचा खून केला आहे. तिला घाटात बघायला जा’ असे वाहनांच्या मागे लागून सांगत होता. हे वृत्त अज्ञातांनी पन्हाळा पोलिसांना सांगितले. त्यानंतर पन्हाळा, कोडोली आणि करवीर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी येऊन त्या माथेफिरूला ताब्यात घेतले.
Kolhapur Crime | “मी सांगायचं काम केलं, आता मृतदेह तुम्ही शोधून काढा…”.; फोन आला नि पोलिसही चक्रावले!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -