Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरयात्रा सुरू असताना गडमुडशिंगी गावावर पसरली शोककळा

यात्रा सुरू असताना गडमुडशिंगी गावावर पसरली शोककळा

खणीमध्ये धुणे धुताना पाय घसरून पडलेल्या आपल्या मुलीला वाचवताना सतीश दत्तात्रय गोंधळी (वय 45, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर) यांचा खणीत बुडून मृत्यू झाला. ही घटना उचगाव पूर्व हद्दीत असणार्‍या खणीमध्ये रविवारी घडली. यात्रा सुरू असताना असा प्रकार घडल्याने गडमुडशिंगी गावावर शोककळा पसरली आहे.

गडमुडशिंगीची यात्रा सुरू असल्याने घरातील साफसफाई करून अंथरूण धुण्यासाठी सतीश गोंधळी, त्यांची पत्नी सुनीता व मुलगी तृप्ती कुटुंबासह उचगाव पूर्व हद्दीत असणार्‍या खणीवर गेले होते. धुणे धुताना मुलीचा पाय घसरून ती खणीत पडली. तिला वाचवण्यासाठी वडील सतीश यांनी उडी घेतली.

मुलीला वाचवण्यात यश आले; पण स्वतःला पोहता न आल्याने सतीश खणीत बुडाले. दरम्यान, पत्नीने आरडाओरडा केल्याने तेथून जाणार्‍या एका व्यक्तीने सतीश यांना पाण्यातून बाहेर काढले. त्यांना उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात पाठवण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकार्‍यांनी त्यांना मृत घोषित केले. सेंट्रिंग काम करणार्‍या सतीश गोंधळीच्या मृत्यूमुळे गावात हळहळ व्यक्त होत आहे. याबाबतची फिर्याद सुनीता सतीश गोंधळी यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात दिली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -