Saturday, July 27, 2024
Homeकोल्हापूरगारगोटीचा झेंडा यूपीएससीत; आनंद पाटील देशात ३२५ वा

गारगोटीचा झेंडा यूपीएससीत; आनंद पाटील देशात ३२५ वा


संघ लोकसेवा आयोगाच्या वतीने 2020 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत येथील आनंद अशोक पाटील हा देशामध्ये 325 क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. अल्प दृष्टी असतानादेखील आनंद पाटील यांनी या सर्वांवर मात करून यश मिळविले आहे. आनंद पाटील यांच्या या यशाने कोल्हापूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

आनंदला तिसऱ्या वर्षी दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू झाला. त्यामुळे त्याच्या दोन्ही डोळ्यावर शस्त्रक्रिया करावी लागली. तीन वर्षांपासूनच त्याला अल्प दृष्टी आहे. त्याचे प्राथमिक शिक्षण गारगोटी येथील नूतन मराठी येथे झाले असून, माध्यमिक शिक्षण आंबोली येथील डायनामिक इंग्लिश पब्लिक स्कूलमध्ये झालेले आहे. येथील मौनी विद्यापिठाच्या आयसीआरईमध्ये सिव्हील इंजिनिअरींग डिप्लोमा केला, तर इस्लामपूर येथील आर. आय. टी. विद्यालयात २०१७ मध्ये बीटेक डिग्री प्राप्त केली. त्यानंतर त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू केली.

2018 साली त्याने यूपीएससीची मुख्य परीक्षा पास केली, मात्र मुलाखतीमध्ये त्यास यश आले नाही. पुन्हा त्यास 2019 मध्येही त्यास यश आले नाही. तरीदेखील अपयशाने खचून न जाता पुन्हा त्याने खडतर परिश्रम घेऊन जानेवारी 2021 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेत त्याने घवघवीत यश संपादन केले. 3 ऑगस्ट रोजी त्याची मुलाखत झाली. या परीक्षेचा काल निकाल लागला. तो देशांमध्ये 325 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. काल (शुक्रवार) सायंकाळच्या सुमारास त्याचा निकाल समजताच त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव झाला.

आपण घेतलेल्या खडतर परिश्रमाला यश आले असून, या निकालाने भारावून गेल्याची प्रतिक्रिया आनंद यांनी व्यक्त केली. वडील सेवा निवृत्त शाखा अभियंता अशोक पाटील यांनी आनंदला अल्पदृष्टी असतानादेखील आनंदने रात्रंदिवस अभ्यास केला. त्याने घेतलेल्या अथक परिश्रमामुळे त्याला हे यश प्राप्त झाले आहे. त्याच्या या निकालाने आम्ही सर्व कुटुंब आनंदित झालो आहोत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -