Friday, June 21, 2024
Homeकोल्हापूरकोल्हापूर महापालिका निवडणुक होणार जानेवारी-फेब्रुवारीत

कोल्हापूर महापालिका निवडणुक होणार जानेवारी-फेब्रुवारीत


कोल्हापूर महापालिका निवडणुक प्रक्रिया पुन्हा नव्याने राबविली जाईल. प्रभाग रचना व आरक्षणही नव्याने काढण्यात येतील. सध्याच्या लोकसंख्येनुसार कदाचित 81 मध्ये आणखी 9 वॉर्ड वाढू शकतील. त्यामुळे नगरसेवकांची संख्या 90 होईल. त्रिसदस्य प्रभाग रचनेंतर्गत 30 प्रभाग होण्याची शक्यता आहे. तसेच महापालिका निवडणुकीचा बिगुल जानेवारी-फेब—ुवारीत वाजेल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, महापालिकेच्या येत्या निवडणुकीत ओबीसी समाजाला आरक्षण मिळेल, असेही त्यांनी सांगितले.
कोल्हापूर महापालिका निवडणुक त्रिसदस्य प्रभाग रचना पक्षीय द़ृष्टीने फायद्याची…
दोन सदस्य प्रभाग रचना हा काँग्रेस पक्षांतर्गत विषय आहे. पक्ष काहीही भूमिका घेऊ शकतो. पक्षाची भूमिका पक्ष मांडू शकतो. सरकार वेगळे आणि पक्ष वेगळा. राज्य शासन म्हणून आम्ही कॅबिनेटमध्ये त्रिसदस्य प्रभाग रचनेचा निर्णय घेतला आहे
त्रिसदस्य प्रभाग रचना आम्ही मान्यच केली आहे. मंत्री म्हणून आमची मते आम्ही मंत्रिमंडळाच्या बैठकीत मांडली. त्यात त्यावर अर्धा तास चर्चा झाली. शेवटी एकमत होऊन त्रिसदस्य प्रभाग रचना करण्यात आली. बैठकीला काँग्रेसचे सर्व मंत्री हजर होते. आम्ही सर्वांनी एकमताने चर्चा केली. प्रदेशाध्यक्षांसमोर जे मुद्दे मांडले गेले, त्याबाबत आम्ही सर्व संबंधितांशी चर्चा करू. त्यात काय उणिवा आहेत, त्यांना काय वाटते, याचे काय नुकसान-फायदे याबाबत चर्चा केली जाईल. चर्चा करून मार्ग काढू, असेही पालकमंत्री पाटील यांनी स्पष्ट केले.
अपक्षांचे फार चालणार नाही…
एक प्रभाग रचना पद्धतीत यापूर्वी एखादा अपक्ष उमेदवार अर्ज भरायचा. इतर प्रभागातील उमेदवारांना मॅनेज करून निवडून येणे चालत होते. पण आता त्रिसदस्य प्रभाग रचनेत मॅनेज करणे तेवढे सोपे नाही. त्यामुळे पुढील काळात त्रिसदस्य रचनेचा फायदाच होईल. दोन-तीन प्रभागावर पक्षांचे वर्चस्व राहते. पक्षीय पातळीवर निवडणुका होतात.
निवडणुकीत अजेंडा, जाहीरनामा ठरेल. मग पक्ष कुठला सत्तेत येतो, त्याला महत्त्व नाही. पण पक्षांची सत्ता असणे, हे कधीही स्थिरतेच्या दृष्टीने फायदेशीर असते, असे ते म्हणाले. पॅनल पद्धतीने निवडणूकीत अपक्षांचे फार चालणार नाही. तीन प्रभाग म्हटले की 17 ते 18 हजार मतदार आले.
यात एकटा उमेदवार काहीही करू शकत नाही. दुसर्यावर अ?वलंबून राहावे लागणार आहे. निवडून येण्यासाठीचे अंडरस्टँडिंग संपणार आहे. आता तिघांनी मिळून एकमेकांचा प्रचार करावा लागणार आहे. निवडणुकीचे गणित वेगळे आहे. ज्या पक्षाची ताकद आहे तो निवडून येणारच आहे, असे सतेज पाटील यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -