सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी चांगली संधी चालून आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनने पोस्ट फेज 09 चे नोटीफिकेशन जारी केले आहे. या माध्यमातून 3261 पदांसाठी भरती होणार आहे. या पदांसाठी निवड होणारे उमेदवार केंद्र सरकारच्या 271 विभागांमध्ये नियुक्त केले जातील. या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया 24 सप्टेंबर 2021 पासून सुरू झाली आहे. एसएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन तुम्ही या जागांसाठी अप्लाय करू शकता.
जारी करण्यात आलेल्या नोटीफिकेशनमध्ये 28 ऑक्टोबर पर्यंत परीक्षेचे शुल्क भरता येणार आहे. अधिक माहितीसाठी उमेदवारांनी एसएससीच्या संकेतस्थळाला भेट द्यावी.
पदांची माहिती
ही परीक्षा कॉम्प्युटर आधारीत असणार आहे. परीक्षा पुढील वर्षीच्या जानेवारी किंवा फेब्रुवारीत होईल. 3261 पदांसाठी भरती होणार असून 100 रुपये परीक्षा फी असणार आहे.
ही परीक्षा दहावी, बारावी, पदवी आदी सर्व शैक्षणिक स्तरातील उमेदवारांसाठी असणार आहे. वेगवेगळ्या योग्यतेच्या उमेदवारांची वेगवेगळ्या कॉम्प्युटर आधारीत परीक्षा होतील. ज्यामध्ये बहुपर्यायी प्रश्न विचारले जातील.