Saturday, December 21, 2024
Homenews‘कलम ३५३’ चा वापर आता पती-पत्नीच्या भांडणातही !

‘कलम ३५३’ चा वापर आता पती-पत्नीच्या भांडणातही !


शासकीय स्तरावरुन सुरू असलेल्या कामात विनाकारण अटकाव करणे, राजकीय दंडेलशाहीचा वापर करत अधिकार्यांना त्यांच्या कर्तव्यापासून रोखणे अशा घटनांमध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याचे गुन्हे दाखल होतात. शासकीय अधिकार्यांसाठी हे एक सुरक्षा कवच मानले जाते. मात्र, अलिकडच्या काळात या कायद्याचा गैरवापर वाढला आहे. आता तर पती-पत्नीच्या वैयक्तिक भांडणात या ‘कलम ३५३’ चा वापर झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नगर शहरात हा प्रकार घडला आहे. एका शासकीय अधिकारी असलेल्या पतीने स्वतःच्या पत्नीविरोधातच सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. पती-पत्नीच्या भांडणातही ‘कलम ३५३’ चा वापर झाल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे.

नगर शहरातील एका दाम्पत्याचा वाद थेट सरकारी कार्यालयापर्यंत पोहचला. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कार्यालयात काही दिवसांपूर्वी ही घटना घडली. त्यातून पत्नीने पतीच्या सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी येथील तोफखाना पोलिस ठाण्यात पत्नीविरोधात ‘कलम ३५३ ’ प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. शासकीय कर्मचारी असलेले विजयकुमार दिलीप वाईकर (वय 30, रा.गुलमोर रोड, नगर) यांनी या प्रकरणी फिर्याद दिली आहे.

पगाराच्या स्लीप मागत शिवीगाळ
वाईकर हे त्यांच्या कार्यालयात काम करत असताना त्यांची पत्नी आल्या. त्यांनी वाईकर यांच्याकडे पगाराच्या स्लीप मागत आरडाओरडा करुन शिवीगाळ केली. पगाराच्या स्लीप न दिल्यास माझ्या जीवाचे बरेवाईट करुन घेईन, अशी धमकीही त्यांनी दिली. त्यांच्या हातातील शासकीय कामाच्या फायली हिसकावून फेकून दिल्या. तसेच वाईकर शासकीय कामानिमित्त मिटींगसाठी बाहेर जात असताना रस्ता अडवून तू ऑफीसचे काम कसे करतो, असे म्हणत शासकीय कामात अडथळा आणल्याची फिर्याद या सरकारी कर्मचार्याने दिली आहे.


पती-पत्नीचा अंतर्गत वाद थेट शासकीय कार्यालयापर्यंत पोहचला. त्यातून पतीने पत्नीविरोधात थेट सरकारी कामात अडथळा आणल्याची तक्रार देत तसा गुन्हाही दाखल झाला आहे. या कायद्याच्या गैरवापराबाबत चर्चा होत असतानाच आता पती-पत्नीच्या वादातही ‘कलम ३५३’चा वापर सुरू झाल्याने सरकारी वर्तुळातही हा चर्चेचा विषय बनला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -