Friday, June 21, 2024
Homenews'गुलाबी' चक्रीवादळाचा परिणाम, महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस!

‘गुलाबी’ चक्रीवादळाचा परिणाम, महाराष्ट्रात पुढचे तीन दिवस वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस!

पश्चिम बंगालच्या उपसागरात (Bay of Bengal) निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचे रुपांतर आता ‘गुलाबी’ नावाच्या चक्रीवादळात (Gulabi cyclone) झाले आहे. हे वादळ आज अरबी समुद्रात धडकणार आहे. त्यामुळे 26 ते 28 सप्टेंबर दरम्यान कोकणासह राज्यातील अनेक भागात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस (Heavy Rainfall) पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.

गुलाबी चक्रीवादळ (cyclone) रात्री उशिरापर्यंत ओडिशा- आंध्र प्रदेशच्या (Odisha -Andhra Pradesh) किनारी भागात पोहोचणार आहे. त्यानंतर ते महाराष्ट्र (Maharashtra) ओलांडून अरबी समुद्रात प्रवेश करण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 26 सप्टेंबरपासून दक्षिण ओडिशा (Odisha), छत्तीसगड (Chatisgarh), आंध्रप्रदेश (Andhrapradesh), तेलंगणा (Telangana), विदर्भ (Vidharbha), मराठवाडा (Marathwada), मध्य महाराष्ट्र (Central Maharashtra), कोकण (Kokan) किनारपट्टी भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मुंबई प्रादेशिक हवामान विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

गुलाबी चक्रीवादळामुळे पुढचे तीन दिवस महाराष्ट्रातील विविध भागामध्ये वादळी वाऱ्यांसह मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. या चक्रीवादळामुळे समुद्र खवळण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांनी मासेमारीसाठी समुद्रात जाऊ नये असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. दरम्यान, या चक्रीवादळामुळे ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागांमध्ये हाय अलर्ट देण्यात आला आहे. खबरदारी म्हणून ओडिशामध्ये ओडीआरएफ (ODRF) आणि एनडीआरएफची (NDRF) टीम पाठवण्यात आली आहे.

दरम्यान, ‘यंदा मान्सूनच्या परतीच्या प्रवासालाही विलंब झाला आहे. राजस्थानमधून (Rajasthan) हा पाऊस आपला परतीचा प्रवास विलंबाने सुरु करणार आहे. जवळपास 7 ते 8 ऑक्टोबरच्या आसपास मान्सून आपला परतीचा प्रवास सुरु करेल असा अंदाज देखील कृष्णानंद होसाळीकर यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, ‘रविवारपासून राज्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याचा प्रभाव विदर्भ (Vidharbh), मराठवाडा (Marathwada) आणि मध्य महाराष्ट्रवर राहिल. कोकणावर (Kokan) विशेषत: मुंबईवर याचा सर्वात जास्त प्रभाव राहिल, असे मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र विभागाच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -