Saturday, December 21, 2024
Homenewsऑक्टोबर महिन्यात तब्बल 10 दिवस बँका राहणार बंद, पाहा संपूर्ण यादी!

ऑक्टोबर महिन्यात तब्बल 10 दिवस बँका राहणार बंद, पाहा संपूर्ण यादी!

कोरोना काळामध्ये (Coronavirus) देशभरातील अनेक बँकांनी (Bank) आपल्या ऑफलाइन सेवांना (Offline services) ऑनलाइन (Online Services) केले आहे. बँकांशी संबंधित सर्वच कामं इंटरनेट बँकिंगच्या माध्यमातून होत आहेत. पण अशामध्ये सुद्धा तुमचे महत्वाचे काम असेल आणि तुम्हाला बँकेमध्ये जायचे असेल तर तुम्हाला बँकेशी संबंधित कामकाज कोणत्या दिवशी बंद (Bank Holiday) असणार आहे हे माहिती असणे गरजेचे आहे. येत्या ऑक्टोबर (October 2021) महिन्यामध्ये तब्बल 10 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्यामुळे फक्त 21 दिवसच बँकांचे कामकाज चालणार आहे. ऑक्टोबर महिन्यात बँका कोण-कोणत्या दिवशी बंद (Bank Holidays In October 2021) राहणार आहेत हे आज आपण जाणून घेणार आहोत

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बँकांच्या सुट्ट्यांची (Bank Holidays) यादी जाहीर केली आहे. या यादीनुसार, ऑक्टोबर महिन्यात 10 दिवस बँक बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये शनिवार-रविवार या साप्ताहिक सुट्ट्यांचा देखील समावेश आहे. अशामध्ये बँकांच्या या सुट्ट्यांबद्दल तुम्हाला माहिती असणे गरजेचे आहे. याच आधारावर तुम्हाला बँकेमध्ये जाण्याचे प्लॅनिंग करणे सोपे जाईल. जर बँक कोणत्या दिवशी बंद आहे हे तुम्हाला माहिती नसेल तर तुम्हाला अडचणींचा सामना करावा लागेल. नाही तर बँकेत जाऊनही तुमचे काम होणार नाही.

ऑक्टोबर महिन्यामध्ये नवरात्र (Navratri 2021) आहे. त्याचसोबत बिहू, महर्षी वाल्मिकी यांच्या जयंतीसह अनेक सण आहेत त्यामुळे बँकांना सुट्ट्या आहेत. महाराष्ट्रात बँकांना 10 दिवस सुट्ट्या असणार आहे. यामध्ये 5 रविवार, 2 शनिवार आणि सणांच्या 3 अशा एकूण 10 सुट्ट्यांचा समावेश आहे. महिन्याच्या पहिल्याच शनिवारी म्हणजे 2 ऑक्टोबरला महात्मा गांधींची जयंती आहे आणि दुसऱ्या दिवशी रविवार आहे. त्यामुळे महिन्याच्या सुरुवातीलाच दोन दिवस बँका बंद राहणार आहेत.

3 ऑक्टोबर – रविवार
9 ऑक्टोबर – दुसरा शनिवार
10 ऑक्टोबर – रविवार
15 ऑक्टोबर – दसरा
17 ऑक्टोबर – रविवार
19 ऑक्टोबर – ईद-ए-मिलाद
23 ऑक्टोबर – चौथा शनिवार
24 ऑक्टोबर – रविवार
31 ऑक्टोबर – रविवार

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -