ताजी बातमी ऑनलाईन टीम
महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी लावणी करत प्रेक्षकांना वेड लावणारी गौतमी पाटील पुन्हा एकदा लावणीमुळे प्रसिद्धी झोतात आली आहे. तिच्या लावणीवर अनेकजण फिदा असतात. मात्र तिच्या कार्यक्रमाला होणारी मोठी गर्दी आणि त्यामधील वाद ही काही नवी बाब राहिलेली नाही. असाच एक प्रकार पुन्हा घडला असून पुण्यात रिलस्टार गौतमी पाटीलच्या बदनामीचा एक धक्कादायक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
पुण्यातील एका स्टेजशो दरम्यान कपडे बदलताना गौतमीचे अश्लिल व्हिडीओ केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. हा व्हिडीओ सध्या सर्वत्र व्हायरल होत असताना गौतमी पाटीलची लोकप्रियता वाढता असताना तिला बदनाम करण्यासाठी हा घृणास्पद प्रकार केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. याबाबत भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनला गौतमी पाटीलकडून तक्रार दाखल करण्यात आली आहे.
गौतमी पाटीलचा गुपचूप काढलेला ‘तो’ व्हिडीओ व्हायरल!
- Advertisment -
ब्रेकिंग न्यूज
- Advertisment -
महाराष्ट्र
राजकीय
- Advertisment -