Friday, February 7, 2025
Homeकोल्हापूरआजरा महागोंडवाडीत वाघाचे दर्शन, वनविभागाने दिला दुजोरा

आजरा महागोंडवाडीत वाघाचे दर्शन, वनविभागाने दिला दुजोरा

ताजी बातमी ऑनलाईन टीम

आजरा तालुक्यातील चिमणे अरळगुंडी मार्गावरील नजिकच्या महागोंडवाडीतील शेतकरी विष्णू माळवकर यांना दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास वाघाचे दर्शन झाले. दिवसाढवळ्या वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील शेतकरी व नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे. शेतातील तारेच्या कुंपणात वाघ सदृश्य प्राण्यांचे केस अडकलल्याचे निदर्शनास आले आहे. शिवाय पायाचे ठसेही या परिसरात आढळलेत. त्यामुळे हा वाघच असण्याची दाट शक्यता वनविभागाकडून वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, यासंदर्भात माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी या भागात भेट दिली असून, हा वाघच असण्याची पुष्टी त्यांनी केली आहे. नागरिकांनी सतर्क राहण्याचे अहवान त्यांनी केले आहे. तसेच शेतकरी बांधवांनी रात्री शेताकडे जाण्याचे टाळावे, असे सांगण्यात आले आहे. चिमणे-अरळगुंडी मार्गावर अरळगुंडी हद्दीत जंगल परिसर आहे. या परिसरातच वाघाचे अस्तित्व असावे, असे वनविभागाचे म्हणणे आहे. पहिल्यांदाच या परिसरात वाघाचे दर्शन झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

ब्रेकिंग न्यूज

- Advertisment -

महाराष्ट्र

राजकीय

- Advertisment -